शहरं
Join us  
Trending Stories
1
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
2
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
3
त्यांनी बाळासाहेबांचे विचार आणि धनुष्यबाण गहाण ठेवले होते; शिंदेंसाठी CM शिंदेंची बॅटिंग, ठाकरेंवर हल्ला
4
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती
5
UIDAI नं मोफत आधार कार्ड अपडेटची मुदत वाढवली, 'या' तारखेपर्यंत शुल्क लागणार नाही
6
IAS अधिकाऱ्याला मिठाईच्या बॉक्समधून लाच देणं नेत्याला पडलं महागात, पोलीस आले अन्....
7
सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांना मोठा दिलासा, मदरसा कायदा घटनात्मक घोषित; हायकोर्टाचा निर्णय फिरला
8
राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला संजय शिरसाट यांचं प्रत्युत्तर; स्पष्टच बोलले
9
भाजपाला मोठा धक्का, अपक्ष निवडणूक लढवत असलेल्या माजी महिला खासदाराचा पक्षाला राम राम
10
“कोल्हापूर उत्तर आम्ही ७ वेळा जिंकली, ७ दिवस भांडलो पण काँग्रेसने जागा सोडली नाही”: संजय राऊत
11
नवाब मलिकांवरून अजितदादा गटाने भाजपा-शिंदे गटाला फटकारलं; "कुणाला काही वाटू दे..."
12
राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग
13
काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार'
14
AUS vs IND : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा! टीम इंडियासमोर मोठे आव्हान, शिखर धवननं दिला धीर
15
Sameer Bhujbal : दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा
16
विराट कोहलीसाठी सिक्सर किंग युवीनं शेअर केली खास पोस्ट
17
महाले यांची माघार; भुजबळ, आहेर, गावित ठाम! दिंडोरीत नरहरी झिरवाळ यांना दिलासा
18
Niva Bupa IPO : 'या' दिग्गज हेल्थ इन्शूरन्स कंपनीचा IPO येणार; किंमत किती, कधीपासून करता येणार अर्ज?
19
"मी यापुढे मराठी बोलणार नाही..."; रेल्वे टीसीचा मुजोरपणा, मराठी माणसाला धमकावलं
20
चातुर्मासाची सांगता: कार्तिकी एकादशी कधी आहे? विष्णुप्रबोधोत्सव महात्म्य अन् मान्यता

Corona virus : चिंताजनक! पुणे विभागात एकाच दिवसांत कोरोनाचे उच्चांकी २०३ रूग्ण वाढले ; पाच मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 7:10 PM

कोरोना बाधित रूग्ण पोहचले १९०५ वर, तर मृतांनी गाठली शंभरी 

ठळक मुद्देपुणे विभागातील ३०५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले

पुणे : पुणे विभागातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या वाढीचा वेग झपाट्याने वाढतच असून, एकाच दिवसांत विभागामध्ये 203 नवीन रूग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक तब्बल 200 रूग्ण एकट्या पुणे जिल्ह्यात वाढले आहेत. तर दिवसभरात कोरोना बाधित 5 रूग्णांची मृत्यु झाला आहे. यामुळे आता कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजार 905 वर जाऊन पोहचली आहे. तर मृत्यु 99 वर जाऊन पोहचले आहेत.पुणे विभागातील 305कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर ?क्टीव रुग्ण 1 हजार 504 आहेत. तर सध्या 77 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.    विभागात 1 हजार 905 बाधित रुग्ण असून 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 30 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 13 बाधित रुग्ण आहेत.पुणे जिल्हयातील कोरोना बाधित रुग्ण 1 हजार 738 झाले आहेत. तर 268 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्हयात ?क्टीव रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 हजार 59 चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह आला असून 1 हजार 905 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.पुणे विभाग एकूण कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण : 1905जिल्हा         रूग्ण संख्या     मृत्यूपुणे              1738                90सातारा         43                    02 सोलापूर       81                    06सांगली         30                   01कोल्हापूर     13                    00एकूण         1905                 99

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूState Governmentराज्य सरकार