पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोचला असून सोमवारी २३४ नवीन रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २३० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ९८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २३४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १६१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. दिवसभरात एकूण २३६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४५ रुग्ण, ससूनमधील ०५ तर खासगी रुग्णालयांमधील ८६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ८९० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार २३४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ७३ हजार ६५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ५२, ससून रुग्णालयात १३३ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ८०१ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्त संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावर; सोमवारी २३४ नवीन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 8:46 PM
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक
ठळक मुद्देदिवसभरात तब्बल २३६ रुग्ण झाले बरे, दिवसभरात १० जणांचा मृत्यूकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४५८