पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी ३५० रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ११ हजार ४६५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १५८ जणांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ६३ झाली आहे. विविध रुग्णालयातील २६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण ३ हजार ९०९ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ३५० पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १०, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २२२ तर खासगी रुग्णालयांमध्ये ११८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २६५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून २१२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी ०६ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४९३ झाली आहे. दिवसभरात एकूण १५७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ११३ रुग्ण, ससूनमधील ०७ तर खासगी रुग्णालयांमधील ३७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७ हजार ७३ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार ९०९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ६७६ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ८४ हजार १८७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ६८६, ससून रुग्णालयात १२८ आणि खासगी रुग्णालयांमध्ये १,०९५ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत शुक्रवारी ३५० रूग्णांची भर; बाधितांची एकूण संख्या ११ हजार ४६५
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:44 PM
शुक्रवारी रुग्ण १५७ झाले बरे , कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सात हजार पार
ठळक मुद्देविविध रुग्णालयातील २६५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू