पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत शनिवारी ८१९ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २० हजार ६६८ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ३९९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ३८५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ७ हजार २७६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शनिवारी त्री साडे दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८१९ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात २१, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ५२३ तर खासगी रुग्णालयांमध्ये २२५ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ३८५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५६ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शनीवारी १८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७०३ झाली आहे. दिवसभरात एकूण ३९९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १९९ रुग्ण, ससूनमधील १० तर खासगी रुग्णालयांमधील १९० रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १२ हजार ६८९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ७ हजार २७६ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ७५१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ३२ हजार २०५ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजारांवर; शनिवारी ८१९ रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2020 3:23 AM
दिवसभरात ३९९ रुग्ण झाले ठणठणीत बरे होऊन घरी परतले..
ठळक मुद्देतब्बल ३९९ जण झाले बरे : ३८५ रुग्ण अत्यवस्थ, १८ जणांचा मृत्यू