पुणे: पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ३४७ झाली असून विभागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांची संख्या २६५ वर पोहोचली आहे. तर आत्तापर्यंत विभागातील २ हजार ४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. विभागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २ हजार ६०७ असून १८७ रुग्ण गंभीर आहेत तर उर्वरित रुग्ण निगराणीखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.विभागातील रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली असून पुणे जिल्ह्यात २४५, सोलापूर जिल्ह्यात १८, कोल्हापूर जिल्ह्यात ५३, सातारा जिल्ह्यात २८ व सांगली जिल्ह्यात ७ नवे कोरोना रुग्ण वाढले आहेत.पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५२५ झाली आहे. तर जिल्ह्यातील २ हजार १८४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात २ हजार ११४ अॅक्टिव्ह रुग्ण असून आत्तापर्यंत २२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात १७८ रुग्ण गंभीर असून उर्वरित निगराणीखाली आहेत.सातारा जिल्ह्यात एकूण १६६ कोरोना बाधित रुग्ण असून आत्तापर्यंत ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.तर साताऱ्यात ८७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सोलापूर जिल्ह्यात ४६१ कोरोना रुग्ण असून आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे तर सोलापुरात २६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. सांगली जिल्ह्यात ५९ कोरोना रुग्ण असून आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला असून २४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या १३६ झाली असून २ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. तर कोल्हापुरात १२१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत.विभागात आत्तापर्यंत ६० हजार ९० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी ४९ हजार २५९ अहवाल प्राप्त झाला आहे तर १० हजार ८८२ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालापैकी ४३ हजार ८१२ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून ५ हजार ३४७ चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.------
Corona virus : पुणे विभागातील कोरोना रुग्णांची संख्या ५ हजार ३४७; एकूण २६५ रुग्णांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 8:24 PM
आत्तापर्यंत विभागातील २ हजार ४७५ रुग्ण बरे होऊन घरी गेले
ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ हजार ५२५