शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

Corona virus : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २३०० वर ; मृत्यू १२७

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 12:07 PM

पुणे शहरातील रुग्णांनी ओलांडला २ हजारांचा टप्पा

ठळक मुद्देएका दिवसांत ९९वाढ व ७ मृत्यूजिल्ह्यात बुधवारी ६६७ संशयित रूग्णांची तपासणी शहरात दिवसभरात ८६ रूग्णांची वाढ : एकूण ७९ रुग्ण अत्यवस्थ तर ७ रुग्णांचा मृत्यू

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या २३००वर जाऊन पोहचली, तर मृत्यु १२७ पर्यंत गेले आहेत. जिल्ह्यात बुधवारी (दि.६) रोजी एकाच दिवसांत ९९नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. तर एका दिवसांत 7 कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला.दरम्यान आत्तापर्यंत ६६५ कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात बुधवारी ६६७ संशयित रूग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५५१संशयित रूग्णांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून , केवळ ९९ संशयिताचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर १७ व्यक्तीचे प्रलंबित आहेत. बुधवारी एका दिवसांत ५७ कोरोना बाधित रूग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तर सध्या ८८ रूग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्षष्ट केले आहे. ------ शहरातील रुग्णांनी ओलांडला २ हजारांचा टप्पादिवसभरात ८६ रूग्णांची वाढ : एकूण ७९ रुग्ण अत्यवस्थ तर ७ रुग्णांचा मृत्यूपुणे शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजारांच्या पार गेला असून सोमवारी दिवसभरात ८६ रूग्णांची भर पडली. शहरात एकूण रूग्णांची संख्या २ हजार २९ झाली आहे. दिवसभरात एकूण सात रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनावर मात करीत पूर्णपणे बरे झालेल्या ५२ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ७९ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.  बुधवारी रात्री साडे आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ८६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०६, नायडू रुग्णालयात ५२ तर खासगी रुग्णालयांमध्ये २८ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ७९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १८ जण व्हेंटिलेटरवर असून ६१ जण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.शहरात सोमवारी सात मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ११८ झाली आहे. एकूण ५२ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५८७ झाली आहे.-------------

एकूण बाधित रूग्ण : २३००पुणे शहर :२०२६पिंपरी चिंचवड : १४८कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : १२६मृत्यु : १२७घरी सोडलेले : ६६५

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडshravan hardikarश्रावण हर्डिकरNavalkishor Ramनवलकिशोर राम