पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रूग्णांमध्ये २४२ रूग्णांची भर पडली असून एकूण रुग्णसंख्या ६ हजार ९३ झाली आहे. तर दिवसभरात बरे झालेल्या १८६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला असून प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार २४० झाले आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १६६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. शुक्रवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २५२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १७, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १३७ तर खासगी रुग्णालयांमध्ये ८८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४५ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १२१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात शुक्रवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३०३ झाली असून यामध्ये ग्रामीणमधील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात एकूण १८६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १२७ रुग्ण, ससूनमधील ०९ तर खासगी रुग्णालयांमधील ५० रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ३ हजार ४५० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ३४० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ११७९ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४७ हजार ७६१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५८८, ससून रुग्णालयात १४६ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६०६ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरातील कोरोनाबधितांचा आकडा सहा हजार पार; दिवसभरात २४२ रूग्णांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 8:39 PM
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १६६ जणांची प्रकृती चिंताजनक
ठळक मुद्देतब्बल १६६ रुग्ण अत्यवस्थ तर १० रूग्णांचा मृत्यूआजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या झाली ३ हजार ४५०