शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

Corona virus : पुणे शहरातील रुग्णांचा आकडा अडीच हजारांच्या पार; दिवसभर पाच रुग्णांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 12:18 PM

दिवसभरात तब्बल ६९ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत.

ठळक मुद्देशहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९८ जणांची प्रकृती चिंताजनक

पुणे : पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये शनिवारी दिवसभरात ९१ नवीन रूग्णांची भर पडली. शहरात रूग्णांची एकूण संख्या २ हजार ५७३ झाली आहे. यासोबतच दिवसभरात तब्बल ६९ रुग्ण उपचारांती बरे होऊन घरी गेले आहेत. एकूण पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण ९६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी रात्री नऊपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ९१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०२, नायडू रुग्णालयात ७५ तर खासगी रुग्णालयांमध्ये १४ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ९८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील १९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ७९ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी पाच मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४९ झाली आहे. दिवसभरात एकूण ६९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये नायडू रुग्णालयातील ४२ रुग्ण, ससूनमधील १२  तर  खासगी रुग्णालयांमधील १५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १०८९ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १ हजार ३३५ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण १ हजार ८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २३ हजार ७५९ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये ९३५, ससून रुग्णालयात १०४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये २९६ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल