पुणे : शहरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा मंगळवारी २४६ ने वाढला असून एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७ झाली आहे. बरे झालेल्या १४० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण २ हजार २७९ आहेत. रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले एकूण १७६ रुग्ण अत्यवस्थ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. मंगळवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २४६ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २०८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल झाले आहेत. शहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १३२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात मंगळवारी ०९ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २७३ झाली आहे. दिवसभरात एकूण १४० रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ८१ रुग्ण, ससूनमधील ०४ तर खासगी रुग्णालयांमधील ५५ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ८७५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार २७९ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २०४४ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४३ हजार ९०७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १५७१, ससून रुग्णालयात १५५ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ५५३ रुग्ण उपचार घेत आहेत.
Corona virus : पुणे शहरात दिवसभरात वाढले २४६ रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ५ हजार ४२७
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 9:06 PM
दिवसभरात १४० रुग्ण घरी : तब्बल १७६ रुग्ण अत्यवस्थ तर ०९ रूग्णांचा मृत्यू
ठळक मुद्देशहरातील उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १७६ जणांची प्रकृती चिंताजनक पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये २०८ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३ रुग्ण दाखल