पुणे : शहरातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत बुधवारी १ हजार १४७ रूग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २४ हजार १६८ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या ५८७ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ४०१ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात ऍक्टिव्ह रुग्ण ८ हजार ४०० असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. बुधवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ११४७ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १६, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ७९३ तर खासगी रुग्णालयांमध्ये ३३८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४०१ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३२२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात बुधवारी १९ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ७७० झाली आहे. दिवसभरात एकूण ५८७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ४३० रुग्ण, ससूनमधील २१ तर खासगी रुग्णालयांमधील १३६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १४ हजार ९९८ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ८ हजार ४०० झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ३ हजार ९५० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत १ लाख ४५ हजार ९४४ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यासोबतच नव्याने सुरू करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन किटद्वारे ७७७ लोकांची तपासणी करण्यात आली असून या किटद्वारे एकूण ४ हजार ७२७ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona virus : अबब.! पुणे शहरात बुधवारी आजपर्यंतची सर्वाधिक रुग्ण वाढ; एकाच दिवसात वाढले ११४७ कोरोनाबाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2020 11:33 PM
बरे झालेल्यांचा आकडा १५ हजारांच्या वर
ठळक मुद्दे४०१ रुग्ण अत्यवस्थ, १९ जणांचा मृत्यू