पुणे : शहरात एप्रिल महिन्यापासून कोरोनाबाधितांची नित्याची वाढ कधी दोनशे ने तर कधी अडीशेने आतापर्यंत वारंवार नोंदविले गेली. पण आज ( दि. २५ जानेवारी) शहरात केवळ ९८ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे.
आरोग्य विभागाचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज आढळून आलेल्या ९८ रुग्णापैकी ९५ टक्के रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत. तर यातील निम्याहून अधिक रुग्णांना घरीच विलनिकरणात राहण्यास सांगण्यात आले आहे.शहरात शुक्रवारी कोरोनाबाधित १२३ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २ हजार ३८५ संशयितांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या पॉझिटिव्हची टक्केवारी ही ४.१ टक्के इतकी आहे. तपासणीच्या तुलनेत पॉझिटिव्हची टक्केवारी ही पण आज सर्वाधिक कमी नोंद झाली आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचपर्यंत शहरातील विविध रूग्णांलयांमध्ये २०५ गंभीर रूग्णांवर उपचार सुरू असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार २५ इतकी आहेत. आज दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत. शहरातील एकूण मृत्यूची संख्या ही ४ हजार ७३९ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत १० लाख ६ हजार २३४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ८४ हजार ७८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.यापैकी १ लाख ७८ हजार १६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. ==========================