शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

Corona virus : पुणे विभागात प्लाझ्मा संकलनात पिंपरीची ‘वायसीएम’ रक्तपेढी आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 12:21 PM

पुणे विभागात २० आॅगस्टपर्यंत २०० एमएलच्या ८०३ प्लाझ्मा बॅग संकलीत करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोना रुग्णांवर उपचार : आतापर्यंत ३४१ बॅगांचे वितरण

तेजस टवलारकरपिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विभागात नऊ रक्तपेढ्यांच्या माध्यमातून प्लाझ्मा संकलन आणि वितरण करण्याचे काम सुरू आहे. विभागात आतापर्यंत सर्वाधिक प्लाझ्मा संकलन आणि वितरणाचे काम पिंपरी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या (वायसीएम) रक्तपेढीने केले आहे. वायसीएम रक्तपेढीने २० आॅगस्टपर्यंत २०० एमएलच्या ३४८ प्लाझ्मा बॅगांचे संकलन करून आघाडी घेतली आहे. त्यामधील ३४१ प्लाझ्मा बॅगांचे वितरण केले असून, सात प्लाझ्मा बॅग शिल्लक आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याांनी दिली.  पुणे विभागात २० आॅगस्टपर्यंत २०० एमएलच्या ८०३ प्लाझ्मा बॅग संकलीत करण्यात आल्या आहेत. ६२० बॅग वाटप करण्यात आल्या असून, १८३ बॅग शिल्लक आहेत. पिंपरीतील वायसीएमनंतर सर्वाधिक प्लाझ्मा बॅग या ससून रुग्णालयाच्या रक्तपेढीत आहेत. ससून रक्तपेढीने आतापर्यंत २०० एमएलच्या १६४ प्लाझ्मा बॅगांचे संकलन केले आहे. त्यामधील ५२ बॅगांचे वितरण केले असून, ११२ बॅग शिल्लक आहेत. कोरोनावर लवकरात लवकर लस यावी यासाठी सर्वत्र प्रयत्न सुरू आहेत. परंतु सध्या तरी कोरोनावर लस उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त होऊन बरे झालेल्या रुग्णांनी रक्तदान केल्यानंतर त्यातून प्रक्रिया करून प्लाझ्मा घेतला जातो. एका दात्याने रक्तदान केल्यानंतर दोन प्लाझ्मा बॅग तयार होतात.  

कोरोनाच्या उपचारासाठी समर्पित सर्व शासकीय रुग्णालय, महानगरपालिकेचे रुग्णालय, खासगी आणि निमशासकीय रुग्णालयांना राज्य शासनाने प्लाझ्मा उपचार पद्धतीचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात प्लाझ्मा थेरपीचा उपयोग केला जात आहे. राज्यात प्लाझ्मा थेरपीमुळे अनेक कोरोनाचे रुग्ण बरे झाले. त्यामुळे प्लाझ्मा बॅगची मागणी सर्वच ठिकाणी वाढलेली आहे.----------या रुग्णांवर होते प्लाझ्मा थेरपी...प्लाझ्मा थेरपी ही उपचारपद्धती कोणत्या रुग्णांवर करायची याचा निर्णय डॉक्टर घेत आहेत. जे रुग्ण इतर औषधांना प्रतिसाद देत नाहीत. ज्यांना आॅक्सिजनची गरज अधिक असते, अशा रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी ही उपचार पद्धत वापरली जात आहे. पुणे शहराबरोबरच पुणे विभागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्यने आढळून आले आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यामध्ये मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे लक्षण असणारे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहे. अशा रुग्णांना प्लाझ्मा थेरपी लाभदायी ठरत असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.---------------

‘‘कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्लाझ्माची आवश्यकता आहे. कोरोनातून मुक्त झालेल्या नागरिकांना प्लाझ्मा देता येईल. अशा नागरिकांनी आपल्या भागातील रक्तपेढीशी संपर्क करून प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा. आपल्या एकाच्या प्लाझ्मा दान करण्यामुळे कोरोनाचा गंभीर रुग्ण बरा होऊ शकतो.’’- एस. बी. पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे.--------------एकाच्या प्लाझ्मा दानाने दोन रुग्ण बरे...प्लाझ्मामुळे रुग्ण बरे होत असल्याने प्लाझ्मा दान करण्याविषयी सध्या मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. दात्यांना पुढे येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. एकाच्या प्लाझ्मा दानाने दोन कोरोनाचे रुग्ण बरे होऊ शकतात. यामध्ये २०० एमएल, १०० एमएलच्या बॅग बनविण्यात येतात. कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह आल्यापासून २८ दिवसांच्या अलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्लाझ्मा दान करता येते. एका वेळेस ४०० ते ५०० मिली प्लाझ्मा दान करता येते.------उपलब्ध असलेल्या प्लाझ्मा बॅग (२०० एमएल) २० आॅगस्टपर्यंतची आकडेवारी  रक्तपेढी                             जमा               वाटप          शिल्लकससून, पुणे                           १६४                ५२              ११२वायसीएम, पिंपरी                  ३४८              ३४१                ७आदित्य बिर्ला, चिंचवड          १७                  १५                २जनकल्याण, पुणे                 १२०                ११२              ८  पूना हॉस्पिटल, पुणे               ४२                  २६              १६सह्याद्री, पुणे                        ३०                  २७               ३गव्हर्न्मेंट कॉलेज, सांगली       १८                   ०               १८छत्रपती शाहू महाराज,को.     ६४                  ४७             १७  एकूण                              ८०३                ६२०             १८३

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSangliसांगलीSatara areaसातारा परिसरkolhapurकोल्हापूरsasoon hospitalससून हॉस्पिटलhospitalहॉस्पिटल