बारामती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिथील केलेले लॉकडाऊन अडचणीचे ठरु पाहत आहे. व्यवसाय व्यापार सुरु होवुन अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या प्रयत्नात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे चित्र आहे. बारामती बुधवारी(दि. १) आढळलेल्या संगणक अभियंत्यांच्या भावासह तालुक्यातील लोणीभापकर येथील पोसाला कोरोना संसर्ग झाला आहे.नुकत्याच मिळालेल्याअहवालानुसार हि माहिती पुढे आली आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी याबाबत माहिती दिली.त्यानुसार संगणक अभियंत्याच्या संपर्कात असणाऱ्या त्याच्या २९ वर्षीय भावाची तपासणी करण्यात आली होती.तसेच, लोणीभापकर (ता.बारामती) येथे लोणावळ्यावरुन परतलेल्या पोलिसाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.लोणी भापकर येथील पोलिसाच्या खोलीमध्ये राहणारा दुसरा पोलिस कोरोनाग्रस्त असल्याची माहिती मिळाली.त्यानंतर लोणी भापकर येथील पोलिसाच्या घशातील स्वॅब घेण्यात आले.त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.दरम्यान,बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या २६ वर पोहचली आहे. आज आढळलेल्या रुग्णांवर बारामतीत उपचार सुुरु करण्यात आले आहेत. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर अनावश्यक,मास्क न लावता फिरणाऱ्यांची संख्या वाढत आहे.परिणामी कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढत आहे. आज बारामती लगत असणाऱ्या इंदापुर तालुक्यात एकाच दिवशी १३ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापाठोपाठ बारामतीत आणखी दोघे जण पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळताच नागरीक धास्तावले आहेत.———————————
Corona virus : बारामतीत दोघांना कोरोनाचा संसर्ग, रुग्णाच्या भावासह पोलिसाचा अहवाल 'पॉझिटिव्ह'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 6:51 PM
शिथील केलेले लॉकडाऊन अडचणीचे ठरु पाहतेय मारक..
ठळक मुद्देबारामती लगत असणाऱ्या इंदापुर तालुक्यात एकाच दिवशी १३ जणांना कोरोना संसर्ग