विवेक भुसेपुणे : पोलीसी चातुर्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन पुण्यात गेल्या तीनमहिन्यांत तब्बल ६३१ कोरोना रुग्णांचा माग काढण्यात आला. या सर्वांचे वेळीच विलगिकरण केले गेल्याने इतरांना होणार संसर्ग टळला.कोरोनाविरुध्दच्या लढाईत बाधितांची वेळीच माहिती मिळणे सर्वात महत्वाचे असते. ट्रेसींग-टेस्टींग आणि क्वारंटाईन या त्रिसूत्रीवरच ही लढाई जिंकता येते. मात्र, एखादा नागरिक कोरोनाबाधित आढळल्यावर मधल्या काळात अनेकांना भेटलेला असतो. त्याच्यामुळे किती जणांना संसर्ग झाला हे शोधणे महापालिकेला अवघड जात होते़ मात्र, पुणे शहर पोलीसांनी ही जबाबदारी स्वीकारली. त्यासाठी खास पथक तयार केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस दलात पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सहायक पोलीस निरीक्षक सुनील गवळी, मच्छिद्र पंडित यांच्यासह २० जणांचे पथक स्थापन केले आहे. महापालिकेकडून रुग्ण निष्पन्न झाल्यावर त्याचा नाव, पत्ता पोलीसांना पाठविला जातो.मोबाइल क्रमांकावरून त्याचे तांत्रिक विश्लेषण केले जाते़ हा रुग्ण मागील पाच दिवसांत कोठे फिरला, कोणाच्या संपर्कात आला असेल याची माहिती गोळा केली. प्रसंगी संबंधित रुग्णाशी प्रत्यक्ष संपर्क साधून त्याची खातरजमा केली जाते. रुग्णाच्या संपर्कात आलेले व ज्यांना त्याच्यापासून संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, अशांच्या माहितीचा अहवाल महापालिकेला पाठविला जातो. या माहितीतून आतापर्यंत तब्बल ६३१ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. याशिवाय ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसून येतनाही, अशा ३ हजार लोकांची माहिती पुढे आली आहे.पोलिसांचे हे पथक दिवसभर कार्यरत असते. माहितीचे विश्लेषण करून कोणत्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची शक्यता आहे़ त् याचा अहवाल महापालिकेला दिला जातो. त्यामुळे संभावित कंटेन्मेंट झोनची रचना करणेही शक्य होते.आतापर्यंत पोलिसांच्या या पथकाने ३३ हजार ५०२ लोकांची माहिती पुरविली असल्याचे मोराळे यांनी सांगितले.पोलीस म्हणतात, यामुळे पसरतो कोरोना शहरातील अनेक भागांत विशेषत: झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. या पथकाने केलेल्या विश्लेषणात त्याची अनेक कारणेसमोर आली आहे़ त्यात प्रामुख्याने झोपडपट्ट्यांमध्ये सर्वांनी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करणे, त्याला व्हेंटिलेशन नसणे, रात्री एकत्र गप्पा मारत बसणे, याचबरोबर आणखी एक कारण समोर आले ते म्हणजे कोणताही कामधंदा नसल्याने तरुण मुले, ज्येष्ठांनी एकत्र बसून पत्ते खेळणे हे कारण आढळून आले आहे. एकत्र पत्ते खेळत असल्याने पत्ते वाटताना ते तोंडात बोट घालतात,तेच पत्ते दुसरे हातात घेताना त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचेआढळून आले आहे.त्यावर मोबाइल टॉयलेट वापरण्याची सूचना या पथकाने महापालिकेला केली होती. पाटील इस्टेट झोपडपट्टीबाबत केलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाल्याने येथील कोरोना संसर्ग थांबविण्यात यश आले असल्याचे या अधिकायानेसांगितले.
Corona virus : पोलिसांनी काढला ६३१ कोरोना रुग्णांचा माग, पोलिसी चातुर्याला तंत्रज्ञानाची जोड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 12:04 PM