पुणे : कोरोनाचा उद्रेक सुरू असताना सोशल डिस्टन्सिंग अतिशूय गरजेचे बनले आहे. एकमेकांपासून अंतर राखून राहणे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे रघुनाथ येमुल गुरुजी यांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी घरगुती हँडलची निर्मिती केली आहे. या हँडलच्या भांड्यांचा वापर करून एक मीटर अंतरावरून भाजीपाला, औषधे, वस्तू यांची सुरक्षित अंतर ठेवून देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. सोशल डिस्टनसिंगची सध्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. येमुल यांनी घरगुती वापरासाठी ही संकल्पना तयार केली असून, सरकारने आणि संशोधकांनी ही कल्पना ऑटोमॅटीक अथवा रोबोटिक स्वरूपात विकसित करावी, असे आवाहन केले आहे.कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडली जावी, यासाठी शासनाकडून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच आवाहनाला प्रतिसाद देत ध्यानगुरु रघुनाथ येमुल गुरुजी यांनी मोठे हँडल असलेल्या भांड्यांची संकल्पना पुढे आणली आहे. वस्तूंची देवाणघेवाण करताना सुरक्षित अंतर राखता यावे, हा यामागचा हेतू आहे. करून येमुल हँडलवर सॅनिटायझरचा वापर करण्यात आला आहे. ऑटोमॅटिक, सेमी ऑटोमॅटिक आणि रोबोटिक्स ग्रीप्स हँडल तयार करताना संशोधकांची, वैद्यकीय तज्ञांचीही मदत घेता येऊ शकते.'दिव्यांग इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे पुण्यातील नागरिकांना स्वत:मध्ये कोरोनाची लक्षणे असतील तर आपणहून पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. आपणहून पुढे येणाऱ्या १०८ लोकांना मानधन देण्यात येणार आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या व्यक्तींना १००० रुपये तर इतरांना १०० रुपये मानधन देण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. -----शासन सातत्याने सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे नागरिकांना आवाहन करत आहे. दूध, भाजीपाला, औषधे अशा दररोजच्या वस्तूची देवाणघेवाण करताना सुरक्षित अंतर राखणे गरजेचे आहे. त्यासाठीच घरगुती वस्तूंचा वापर करून मी एक मीटर हँडल असलेली भांडी माज्या घरगुती वापरासाठी बनवली आहेत. ही संकल्पना सरकार मोठ्या स्वरूपात विकसित करू शकते. ऑटोमॅटिक अथवा रोबोटीक हँडल तयार केल्यास त्याचा मोठा उपयोग होऊ शकतो. - रघुनाथ येमुल
Corona virus : कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी ‘एक मीटर ग्रीप्स हँडल’ची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 5:58 PM
या हँडलच्या भांड्यांचा वापर करून एक मीटर अंतरावरून भाजीपाला, औषधे, वस्तू यांची सुरक्षित अंतर ठेवून देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे.
ठळक मुद्देरघुनाथ येमुल गुरुजी यांचा पुढाकारसरकारने आणि संशोधकांनी ही कल्पना ऑटोमॅटीक अथवा रोबोटिक स्वरूपात विकसित करावी