पुणे : शहरात सोमवारी ११९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २३६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार ३१३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १.८८ टक्के इतकी आढळून आली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ८६ असून, आज दिवसभरात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही १९९ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४० इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ५० हजार २७६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८९ हजार २१ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७८ हजार ११९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८१६ जणांचा मृत्यू झाला आहे.