पुणे : शहरात सोमवारी १२८ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार २७२ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.०४ टक्के इतकी आढळून आली आहे.दरम्यान, आज दिवसभरात १५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ३५ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ८० टक्के इतका आहे़
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०३ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २८५ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख ११ हजार ११ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९० हजार ५७४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७९ हजार ६८६ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८५३ जणांचा मृत्यू झाला आहे. --------