पुणे : शहरात सोमवारी १३९ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ५९५ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.०२ टक्के इतकी आढळून आली आहे. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ६४२ असून, आज दिवसभरात ८ जणांचा मृत्यू झाला आह़े़ यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२५ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३३२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ४४ हजार २८० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८५ हजार ८५५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७४ हजार ४७७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७३६ जणांचा मृत्यू झाला आहे.