पुणे : शहरात सोमवारी १९६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २८९ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ आज विविध तपासणी केंद्रांवर ६ हजार २७७ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३.१२ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या २ हजार ८५५ इतकी असून, आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २३५ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४८७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २७ लाख ९२ हजार ९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८४ हजार ८० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७२ हजार २५९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ६९६ जणांचा मृत्यू झाला आहे. --------