पुणे : शहरात मंगळवारी २२० कोरोनाबाधित आढळून आले असून, ३३१ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत शहरात २ हजार ३५४ सक्रिय रुग्ण आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ४ हजार ८७८ संशयितांची तपासणी करण्यात आली. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ही ४.५१ टक्के इतकी आहे. तर आज १५ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १० जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ३४२ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ४८२ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २६ लाख २३ हजार ६६२ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ७६ हजार २१० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ६५ हजार ३१४ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ५४२ जणांचा मृत्यू झाला आहे.
--------