पुणे : शहरात मंगळवारी २३७ कोरोनाबाधित आढळून आले असून, १८१ जण कोरोनामुक्त झाले आहेत आज विविध तपासणी केंद्रांवर ५ हजार ४५३ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ४.३४ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४१७ असून, आज दिवसभरात १० जणांचा मृत्यू झाला आह़े. यापैकी ३ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २१६ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३५१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ५५९ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८७ हजार ८०० जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७६ हजार ६५९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७८६ जणांचा मृत्यू झाला आहे.