पुणे : शहरात गुरूवारी दिवसभरात २५७ रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात २८४ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्या घटली असून हा आकडा २ हजार ७०३ झाला आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ४३७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ६६९ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ५०९झाली आहे. पुण्याबाहेरील ११ मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण २८७ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ६३ हजार ८८५ झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ७५ हजार ९७ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या २ हजार ७०३ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ५ हजार ८१७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत २५ लाख ९८ हजार ७३७ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.