पुणे : शहरात शनिवारी २५८ कोरोनाबाधित आढळून आले असून, २४९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ३७१ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.७५ टक्के इतकी आढळून आली आहे. दरम्यान, आज दिवसभरात १४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार १२८ असून, शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ८० टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०१ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या २९६ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २९ लाख ९५ हजार ८६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९० हजार २२८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७९ हजार २५७ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८४३ जणांचा मृत्यू झाला आहे. --------