पुणे : शहरात बुधवारी २६६ कोरोनाबाधित आढळून आले असून, २१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ९ हजार ६०४ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २.७६ टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ५६ असून, आज दिवसभरात १३ जणांचा मृत्यू झाला आह़े. यापैकी ८ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १.८० टक्के इतका आहे़ पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २०२ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाºयांची संख्या २६१ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत ३० लाख २६ हजार ७१६ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ९१ हजार ८ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ८० हजार ८९ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ८६३ जणांचा मृत्यू झाला आहे.