पुणे : शहरात बुधवारी २९४ कोरोनाबाधित आढळून आले असून, ३४७ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज विविध तपासणी केंद्रांवर ७ हजार ९३० संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी ३़७० टक्के इतकी आढळून आली आहे.
शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही २ हजार ४८८ असून, आज दिवसभरात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी २ जण हे पुण्याबाहेरील आहेत. शहरातील आजचा मृत्यूदर हा १. ७९ टक्के इतका आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही २२४ इतकी असून ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या ३४७ इतकी आहे. शहरात आत्तापर्यंत २८ लाख ५८ हजार ९४ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ८६ हजार ३६५ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ७५ हजार १२८ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ८ हजार ७४९ जणांचा मृत्यू झाला आहे.