पुणे : जिल्ह्यात सोमवारी (दि.15) रोजी एकाच दिवसांत तब्बल ३०३ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण बरे होऊन घरी गेले. तर नव्याने ३१८ रुग्णांची भर पडली. यामुळे आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या १२ हजार २४३ एवढी झाली आहे. यापैकी आत्तापर्यंत तब्बल ७८२२ रुग्ण बरे देखील झाले आहेत. तर सोमवारी १३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, एकूण ५११ कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे, ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. यामुळे गेल्या साडे तीन महिन्यांत कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी जिल्ह्यात १२ हजारांचा पट्टा पार केला आहे. यात ८०टक्के रुग्ण एकट्या पुणे शहरामध्ये असून, पुणे आणि जिल्ह्यात संख्या अद्याप ही मर्यादित आहे असे म्हणावे लागेल. पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी १० हजारांचा तर पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात प्रत्येकी एक हजारांचा टप्पा पार केला आहे.----- शहरातील रुग्ण संख्या दहा हजारांच्या उंबरठ्यावरपुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दहा हजारांच्या उंबरठ्यावर जाऊन पोचला असून सोमवारी २३४ नवीन रूग्णांची भर पडली. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ९ हजार ८९० झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या २३६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २३० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ९८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
सोमवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या २३४ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात १५, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १६१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ५८ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २३० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४० रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १९० रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी १० मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४५८ झाली आहे. दिवसभरात एकूण २३६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४५ रुग्ण, ससूनमधील ०५ तर खासगी रुग्णालयांमधील ८६ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ४४६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ८९० झाली आहे.
....................................
पिंपरीत सोमवारी ६९ जण कोरोना पॉझिटिव्ह
पिंपरीत कोरोनाचा विळखा वाढत असला तरी कोरोनामुक्त होण्याचे आणि अहवाल निगेटिव्ह येण्याचे प्रमाणही चांगले आहे. सोमवारी ६९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून दिवसभरात ६१ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२४६ वर गेली आहे. २६९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर एका दिवसात २९५ जणांना डिस्चार्ज दिला आहे. पिंपळेगुरव येथील वृद्धांचा मृत्यू झाला आहे.पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, सोमवारी दिवसभरात ६९ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामध्ये ३९ पुरुष तर २८ महिलांचा समावेश आहे.
एकूण बाधित रूग्ण : 12243पुणे शहर : 10021पिंपरी चिंचवड : 1177कॅन्टोनमेन्ट व ग्रामीण : 1045मृत्यु : 511बरे झालेले रुग्ण : 7922