शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

Corona virus : पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४७२ कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ; एकूण रुग्णसंख्या ११ हजार ११५

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:04 AM

विविध रुग्णालयातील २४५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू

ठळक मुद्देकोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४८७१९३ रुग्ण घरी, आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९०६

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ११ हजारांच्या पार जाऊन पोचला असून गुरुवारी तब्बल ४७२ नवीन रूग्णांची भर पडली. ही आत्तापर्यंतची सर्वाधिक वाढ आहे. कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ११ हजार ११५ झाला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १९६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २४५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ०६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण ३ हजार ७२२ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. गुरुवारी रात्री दहापर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या ४७२ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०९, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये ३१४ तर खासगी रुग्णालयांमध्ये १४९ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २४५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४९ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १९६ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात गुरूवारी ०६ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ४८७ झाली आहे. दिवसभरात एकूण १९३ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील १४१ रुग्ण, ससूनमधील १३ तर  खासगी रुग्णालयांमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६ हजार ९०६ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या ३ हजार ७२२ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ४६४ नागरिकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून आत्तापर्यंत ८१ हजार ५११ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण अ‍ॅक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये २ हजार ६२५, ससून रुग्णालयात १२४ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ९७३ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू