पुणे : पुणे शहरात गेल्या आठवड्यापासून कोरोनाबाधित रुग्णांमध्ये घट कायम राहिली असून बुधवारी दिवसभरात ६८३ नवे रुग्ण आढळून आले. तर, दिवसभरात १ हजार १५८ रूग्ण बरे झाले आहेत. विविध रुग्णालयातील १०२० रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या ८ हजार ३५६ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १०२० जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, २ हजार १२४ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. दिवसभरात ३७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ८ हजार ११५ झाली आहे. पुण्याबाहेरील १० मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिवसभरात एकूण १ हजार १५८ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ४ लाख ५१ हजार ७० झाली आहे. तर, एकूण रुग्णसंख्या ४ लाख ६७ हजार ५४१ झाली आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ८ हजार ३५६ झाली आहे. ------------- दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ८ हजार ७५१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली आहे.