शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

Corona Virus Pune : पुणे ग्रामीणच्या कोरोनाबाधित दरात घट; आता निर्बंधांचं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 21:39 IST

बाधित दर आला ४.९ टक्यांवर : कोरोना नियमावलीतून गावांना सूट मिळण्याची प्रतीक्षा

पुणे : ग्रामीण भागातील कोरोना बाधित दर गेल्या अनेक आठवड्यापासून ५.५ च्या खाली येत नसल्याने कोरोना निर्बंधातून सुट देण्यात आली नव्हती. मात्र, शुक्रवारी ग्रामीणचा कोरोना बाधितदर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर ४.९ टक्यांवर आला आहे. हे चित्र दिलासादायक असून आता निर्बंधातून कधी सुट मिळणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढली. जळपास जिल्ह्यातील प्रत्येक गावात कोरोनाबाधित पोहचले होते. १३ तालुक्यांतील सर्वच गावात कोरोना पसरला होता. फक्त ३४ गावे कोरोनामुक्त राहिली होती. वाढत्या रूग्णसंख्येमुळे ग्रामीणचा बाधित दर हा १४ टक्यांवर पोहचला होता. त्यात हॉटस्पॉट गावांची संख्याही मोठ्या प्रमाणात होती. हा बाधित दर आणि हॉटस्पॉट गावांची संख्या खाली येत नव्हती. त्या तुलनेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील बाधित दर झपाट्याने कमी झाल्याने त्यांना कोरोना निर्बंधातून सुट मिळाली. मात्र, ग्रामीण भागात निर्बंध कायम होते. हा बाधित दर जुलै महिन्यात ७ टक्यांवर आला. मात्र, तो ५ टक्यांखाली येत नसल्याने निर्बंधातून ग्रामीण भागाला सुट मिळत नव्हती. यामुळे जिल्हा परिषदेने हॉटस्पॉट गावात तसेच बाधित गावांत धडक सर्वेक्षण मोहिम राबविली. या द्वारे कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आणि प्रत्येक घरात जाऊन घराबाहेर पडणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. यामुळे बाधितांचे सापडण्याचे प्रमाण वाढले होते. असे असले तरी रूग्णसंख्या काही केल्या कमी येत नव्हती. सध्या जिल्ह्यातील एकूण गावांपैकी सुमारे ४०० गावांत कोरोनाबाधित रुग्ण आहेत. जिल्हा परिषदेने दहापेक्षा अधिक रुग्ण असलेल्या गावांत बाधित कुटुंबांतील सर्व सदस्यांची आणि ज्या गावात दहापेक्षा कमी रुग्ण आहेत त्याठिकाणी कोरोना चाचण्या करण्याची धडक मोहीम सुरू केली आहे.

गेल्या तीन आठवड्यात या मोहिमेंतर्गत २ लाख ३१ हजार ६७६ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्याची माहिती आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. गेल्या चार आठवड्यापासून ५.५ टक्यांवर स्थिरावलेला कोरोना बाधित दर अखेर शुक्रवारी खाली आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार यांनी दिली. बाधित दर५ च्या खाली आला असल्याने निर्बंधातून सुट मिळेल का याबाबत त्यांना विचारले असता या संबंधीचा निर्णय उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत होईल असे त्यांनी सांगितले.चार आठवड्यात २ लाख ३७ हजार ६७६ जणांची तपासणी

ग्रामीण भागातील बाधितदर कमी आणण्यासाठी तसेच हॉटस्पॉट गावांची संख्या कमी करण्यासाठी जिल्ह्यात धडक सर्वेक्षण मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत चार आठड्यात २ लाख ३७ हजार ६७६ जणांची तपासणी करण्यात आली. तसेच हॉटस्पॉट गावात भारतीय जैन संघटनेतर्फे जनजागृती सुरू असून याचाही चांगला परिणाम झाल्याचे भगवान पवार यांनी सांगितले.----

ग्रामीण भागाचा कोरोना बाधित दर हा अनेक दिवसांपासून ५ टक्यांच्या खाली आला आहे. सध्या ग्रामीण भागाचा बाधितदर हा ४.९ टक्के तर एकुण जिल्ह्याचा बाधित दर३.८ टक्के ऐवढा झाला आहे.- डॉ. भगवान पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीAjit Pawarअजित पवारCorona vaccineकोरोनाची लस