पुणे : शहरात कुठलीही जमावबंदी लागू करण्यात येणार नसल्याचे नुकतेच स्पष्ट झाले असले तरी, ज्या भागात कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. अशी शहरातील ७१ ठिकाणे महापालिकेने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केली आहेत. अनलॉकच्या प्रक्रियेत आता कोरोनाबाधितांची संख्या अधिक असलेला भागच सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहिर करण्यात येत असून, दर आठवड्याला आढावा घेऊन कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेला भाग हा या क्षेत्रांमधून वगळण्यातही येत आहे. ३ सप्टेंबर रोजी काढलेल्या आदेशात शहरात ७४ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (कंटन्मेंट झोन) जाहीर करण्यात आली होती.तर १९ सप्टेंबर रोजी काढण्यात आलेल्या आदेशात २० प्रतिबंधित क्षेत्रे की जेथील कोरोनाचा प्रभाव आटोक्यात आल्याने वगळण्यात आली आहेत. मात्र नव्याने १७ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, सदर क्षेत्रांमध्ये बाहेरील व्यक्तींना अथवा तेथील व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई असणार आहे. तसेच या भागात जाणारे-येणारे रस्ते पत्रे लावून बंद करण्यात येतील. राज्यासह पुणे शहरातही अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येत असली तरी, कोरोनाचा संसर्गाचा प्रभाव जास्त असलेले शहरातील भाग दर आठवड्याला महापालिकेकडून आढावा घेऊन प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात येत आहेत.याच प्रक्रियेत शहरातील ७१ ठिकाणी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आले असून, येथील अत्यावश्यक सेवा वगळता दैनंदिन व्यवहारांवर १९ सप्टेंबरच्या रात्री बारा वाजल्यापासून मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
नव्याने जाहिर करण्यात आलेल्या १७ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र घोरपडी,स.नं. ४९ पै़पाम ग्रु सोसायटी, घोरपडी स. नं.४५ पै़लक्ष्मी टेरेस सोसायटी, शिवाजीनगर भांबुर्डा, स.नं१०२ पै़आशानगर को ऑप. हौ़सोसायटी, भांबुर्डा स.नं ९८,९९ पैकी गोखलेनगरच्या कुलकर्णी शाळेसमोरील भाग, वडगाव शेरी स.नं ५३ पैक़ुमार प्राईम वेरा, वडगाव खुर्द स.नं. ३४ पै़मँगो नेस्ट सोसायटी, वडगाव बु. स.नं. १४,१५ सनसिटी माणिकबाग सिंहगड रोड, हिंगणे खुर्द स.नं १५ व ३५ पै़आनंदनगर संपूर्ण, धायरी स. नं१४७ पैग़ल्ली नं. १७ येथे प्रतिबंधित क्षेत्र जाहिर करण्यात आले आहे.
धनकवडी बालाजीनगर स. नं २० ते २४ पै सिध्दी हॉस्पिटल परिसर, खुशबू हॉस्टेल परिसर, पुण्याईनगर, काशिनाथ पाटील नगर, पवार हॉस्पिटल परिसर, रजनी कॉर्नर येथे, कोंढवा बु़ येथील सर्व्हे ६० ते ६४ मध्ये शांतीनगर सोसायटी आणि साळवे गार्डन परिसर, साईनगर गल्ली नं१ ते ९,स.नं ३,८,९ पैकी कपिलनगर, लक्ष्मीनगर भाग नव्याने सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेश येईपर्यंत जाहिर करण्यात आले आहेत.