शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
3
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
4
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
5
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
6
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
7
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
9
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
10
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
11
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
12
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
13
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
14
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
15
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
18
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
19
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
20
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी

Corona virus : कोरोना 'बाधित व संशयितां'च्या सेवकांची पुणे महापालिका घेणार ‘ विशेष काळजी ’

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 12:46 PM

कामाचा जास्तीचा ताण येऊ नये म्हणून नव्याने अधिकच्या २० डॉक्टर व ४० नर्स यांची नियुक्ती केली जाणार

ठळक मुद्देरुबल अगरवाल  : अतिरिक्त ताण येऊ नये म्हणून अधिकची नियुक्ती

पुणे : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करीत असतानाच, डॉ़ नायडू हॉस्पिटलमध्ये ‘कोरोना’बाधित व संशयितांची अहोरात्र काळजी घेऊन उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची महापालिकेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. आजपासून पालिकेने हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवकांना घरी जाण्या-येण्यासाठी स्वतंत्र वाहनव्यवस्था केली आहे. महापािलकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी डॉ. नायडू हॉस्पिटलमधील डॉक्टर, नर्स यांच्यावर कामाचा जास्तीचा ताण येऊ नये म्हणून नव्याने अधिकच्या २० डॉक्टर व ४० नर्स यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे सांगितले. डॉ. नायडू हॉस्पिलमध्ये साधा सर्दी-खोकला झालेल्या नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी करू नये. नागरिकांनी कुठेही विनाकारण गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. स्वयंशिस्तीने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन अगरवाल यांनी केले. लक्षणे आढळून आलेल्यांनी करावा रुग्णवाहिकेचा वापरपरदेशातून आल्यावर पुढील काही दिवसांत संबंधिताला ‘कोरोना’संबंधित लक्षणे आढळून आल्यास त्याने उपचारांसाठी डॉ.नायडू हॉस्पिटलमध्ये येताना पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी करावी व या रुग्णवाहिकेतूनच हॉस्पिटलमध्ये यावे़ जेणेकरून संबंधित व्यक्तीचा संसर्ग इतरांना होणार नाही, असे आवाहन रूबल अगरवाल यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्र शासनाच्या १०८ क्रमांकावरील रुग्णवाहिकेबरोबरच पालिकेच्या १० स्वतंत्र रुग्णवाहिका डॉ़ नायडू हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. सद्य:स्थितीला नायडूमध्ये २० निवासी डॉक्टर, ४० नर्ससह १२५ जणांचा वैद्यकीय सेवकांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे़ तीन शिफ्टमध्ये येथे काम करता यावे, याकरिता नव्याने मनुष्यबळ उपलब्ध करून देणार आहे. दरम्यान, येथील सर्व वैद्यकीय सेवकांना हॉस्पिटलमध्येच जेवणाची व राहण्याची उत्तम सोय देण्यात आल्याचेही अगरवाल यांनी सांगितले.   

 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका