शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

Corona virus in pune : पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या गेली ८ हजारांच्या पार; दिवसभरात १८१ नवीन रुग्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 8:15 PM

आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १८५ झाली आहे...

ठळक मुद्देविविध रुग्णालयातील २०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू दिवसभरात बरे झालेल्या १६६ जणांना सोडण्यात आले घरी

पुणे : शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आठ हजारांच्या पार गेला असून सोमवारी दिवसभरात १८१ रूग्णांची भर पडली असून रुग्णांचा एकूण आकडा ८ हजार ०६२ वर जाऊन पोचला आहे. दिवसभरात बरे झालेल्या १६६ जणांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील २०९ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात अ‍ॅक्टिव्ह रुग्ण २ हजार ४८६ असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सोमवारी रात्री आठपर्यंत शहरात नव्याने नोंद करण्यात आलेल्या १८१ पॉझिटिव्ह रूग्णांपैकी ससून रूग्णालयात ०८, नायडूसह पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १८१ तर खासगी रुग्णालयांमध्ये ४३ रुग्ण दाखल झाले आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी २०९ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून १६१ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. शहरात सोमवारी १३ मृतांची नोंद करण्यात आली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ३९१ झाली आहे. दिवसभरात एकूण १६६ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. यामध्ये पालिकेच्या रुग्णालयांतील ११० रुग्ण, ससूनमधील ०९ तर  खासगी रुग्णालयांमधील ४७ रुग्णांचा समावेश आहे. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ५ हजार १८५ झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या २ हजार ४८६ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २१०८ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ६० हजार ७९८ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे. एकूण एक्टिव्ह रूग्णांपैकी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये १७२८, ससून रुग्णालयात १५२ आणि खासगी रुग्णालयांमध्ये ६०६ रुग्ण उपचार घेत आहेत.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNavalkishor Ramनवलकिशोर रामcommissionerआयुक्त