Corona Virus in Pune:...तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही; अजित पवारांचा पुणेकरांना निर्वाणीचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2021 12:48 PM2021-03-26T12:48:01+5:302021-03-26T12:50:03+5:30
Ajit Pawar On Pune Lockdown Decision: 1 एप्रिल पासून जे काही कार्यक्रम आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या 50 पेक्षा जास्त असता नये, असे नियम पाळण्याचे आदेश अजित पवारांनी दिले.
पुण्यातील परिस्थिती फार गंभीर असून लोकांना मास्क, फिजिकल डिस्टन्स ठेवावं लागणार आहे. पुण्यात कोरोनाची (Corona In Pune) आकडेवारी वाढत आहे. 50 टक्के खासगी बेड ताब्यात घेणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला. 316 लसीकरण केंद्र शहर आणि ग्रामीण भागात आहेत, ती दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून पुढील शुक्रवारी लॉकडाऊनवर निर्णय घेणार असल्याचा इशारा उप मुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणेकरांना दिला आहे. (Ajit Pawar will take Decision on 2 April of pune Corona Lockdown.)
आढावा बैठकीनंतर पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. 1 एप्रिल पासून जे काही कार्यक्रम आहेत जे कोणी लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी खासगी कार्यक्रम बंद केले पाहिजेत. लग्न लॉनमध्ये करा किंवा आणखी कुठे संख्या 50 पेक्षा जास्त असता नये. अंत्यविधीला 20 पेक्षा जास्त लोक नकोत. कोरोना रुग्णांची संख्या मागील वेळेपेक्षा वाढली आहे. रात्रीची संचारबंदी पुन्हा सुरू होणार आहे. नियमांचे पालन केले नाही, असेच पुढील5-6 दिवस सुरु राहिले तर 2 एप्रिलला कठोर निर्णय घ्यावे लागतील असा इशारा अजित पवारांनी दिला आहे.
लग्न सोडून इतर समारंभ पूर्ण बंद करावेत. उद्यान, बाग बगीचे सकाळीच सुरू राहणार. मॉल, मार्केट, चित्रपट गृह 50 टक्के उपस्थितीमध्ये सुरु ठेवण्यात येतील. सार्वजनिक वाहतूक सुरूच ठेवणार, ऑक्सिजन प्लँट चाकण जवळ झालाय त्यामुळे पुरवठा सुरळीत, कमी पडला तर राजगडमध्ये बोलून ठेवत आहोत. पुणे शहराच्या जम्बो केंद्रातील बेड पूर्ण क्षमतेने सुरू करणार, पिंपरी चिंचवडमधील जम्बो 1 एप्रिलपासून पूर्ण वापरत आणणार, ससून 300 ऐवजी 500 कोविड बेड करणार असल्याचे सांगताना अजित पवारांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ब्रेक करायचे असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असे म्हटल्याने लॉकडाऊनचा विचार होत असल्याचे सुतोवाच दिले आहेत.
साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊनला पर्याय नाही. वैद्यकीय तज्ज्ञ, लोक प्रतिनिधी यांचेही हेच मत आहे. परंतू Mpsc च्या पुढच्या परीक्षा ठरल्याप्रमाणे होतील. 10वी / 12 वी परीक्षा वेळेत होतील.विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे पवार म्हणाले.