शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Corona Virus : पुण्यातील 'कमिन्स' कंपनी कोरोनाचा 'हॉटस्पॉट' ; महापालिकेकडून ३ दिवस कामकाज बंद ठेवण्याचे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 5:35 PM

गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत कमिन्स कंपनीत २४० कामगारांना कोरोनाची लागण व त्यातील ३ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पुणे : पुणे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांसोबतच औद्योगिक कंपन्यांसाठी निर्बंध कडक करण्यात आले आहे. या सरकारी निर्बंधांचे पालन होत नसल्यास महापालिकेकडून कारवाई देखील सुरु आहे. पुण्यातील डहाणूकर कॉलनी येथे असणाऱ्या 'कमिन्स' कंपनीत देखील कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले असून ५० कोरोना रुग्ण आढळून आले आहे. याच कारणास्तव कमिन्स कंपनीला 'कोरोना हॉटस्पॉट' क्षेत्र म्हणून जाहीर करताना आजपासून ( दि.२०) ते २३ मे असे ३ दिवस कंपनी बंद ठेवण्याचे आदेश कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने दिले आहे.

कोथरुड क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त  सचिन तामखडे यांनी याबाबत कमिन्स कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी यांना पत्र पाठवले आहे. यात राज्य शासन व पुणे महापालिकेच्या  कोरोना प्रतिबंधक नियमांचे कंपनीत काटेकोरपणे पालन होत नसल्याचे नमूद केले आहे. तसेच गेल्या २ महिन्यांच्या कालावधीत कंपनीत जवळपास २४० कामगारांना कोरोनाची लागण झाल्याचे  त्यातील ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आणि सध्याच्या घडीला ५० कामगार कोरोना बाधित आहे.याचवेळी कंपनीतील कामगारांची जेवणाची व्यवस्था एकाच ठिकाणी असल्याने कामगारांची गर्दी होत आहे. यातून कोरोना प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याचेही पत्रात स्पष्टपणे सांगितले आहे.

याच पार्श्वभूमीवर कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक महापालिका आयुक्त सचिन तामखडे यांनी पाठ्वलेल्या पत्रात कंपनीचे कामकाज तीन दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्याचसोबत सर्व कामगारांची कोविड चाचणी करून त्याचा अहवाल २२ तारखेपर्यंत सादर करावा. तसेच कामगारांना फेसशिल्ड मास्क उपलब्ध करून देण्यात यावे, कॅन्टीनमध्ये बसून कामगारांना जेवणाला प्रतिबंध करण्यात घालण्यात आला आहे. याचवेळी सर्व कामगारांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश देतानाच कंपनीचा परिसर व यंत्र सामग्री यांचे वेळोवेळी निर्जंतुकीकरण करण्याचेही सक्त ताकीद  प्रशासनाने कंपनीला दिली आहेत.

कंपनीकडूनही अधिकृत दुजोरादरम्यान, कमिन्स कंपनीकडूनही अधिकृत पत्रक जारी करण्यात आलं असून पुणे मनपाकडून नोटीस मिळाल्याचं मान्य करण्यात आलं आहे. संपूर्ण घटनेवर कंपनीचं बारकाईनं लक्ष असून आवश्यक अशी सर्व पावलं उचलली जात असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. कोरोना संबंधिच्या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. कंपनीनं यावेळी कोरोना संबंधी घेतली जाणारी काळजी आणि सुरक्षा नियमांची सविस्तर माहितीच प्रसिद्ध केली आहे. यात कंपनीत पूर्णपणे सॅनिटायझेशन आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीचा उल्लेख करण्यात आला आहे. 

टॅग्स :PuneपुणेkothrudकोथरूडPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcommissionerआयुक्त