शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

Corona virus : कोरोनातून बरे झालेले पोलीस करणार रुग्णांचे समुपदेशन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 5:40 PM

पुणे पोलीस दलातील जवळपास सव्वा दोनशे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

ठळक मुद्देपुणे पोलिसांचा 'मनोभरोसा' उपक्रम : ज्ञानप्रबोधिनीचे सहकार्य१७७ पोलीस अधिकारी व कर्मचारी हे बरे झाले आहेत पूर्णपणे

पुणे : कोरोनाची लागण झाल्यानंतर नागरिक घाबरुन जातात. त्यात लोकांकडून अनेक बाबी ऐकण्यात आल्याने त्यांचा धीर खचून जातो, अशावेळी त्यांचे समुपदेशन करुन त्यांना कोरोनाशी लढण्यासाठी नवी ताकद देण्याचा प्रयत्न पुणेपोलिसांच्या मनोभरोसा या उपक्रमातून करण्यात येणार आहे.पुणे पोलीस दलातील जवळपास २६९ पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील १८५ पोलीस अधिकारी व कर्मचारी हे पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यातील बहुतांश कर्मचारी हे पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. या कर्मचार्‍यांच्या अनुभवाचा उपयोग शहरातील कोरोना रुग्णांना करुन देण्यासाठी ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने पुणे पोलिसांनी मनोभरोसा हा उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत एक कार्यशाळा सोमवारी पोलीस आयुक्तालयात झाली. यामध्ये कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले ३५ कर्मचारी आणि ज्ञानप्रबोधिनीचे ३० समुपदेशक सहभागी झाले होते.

या कार्यशाळेला डॉ. कविता करेर, डॉ. ममता व्यंकटेशम, त्यांची कन्या नेहारिका व्यंकटेशम, ज्ञानप्रबोधिनीच्या अनघा लवळेकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी समुपदेशन कसे करावे, याची माहिती या कार्यशाळेत दिली. या उपक्रमासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. पुणे शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना अनेक समस्या समोर येत आहे. त्यातून कोरोना रुग्ण, त्यांचे नातेवाईक खचून जात आहे. कोरोना बाधित झालेले आणि त्यातून पूर्णपणे बरे झालेले हे पोलीस कर्मचारी फोनद्वारे कोरोना बाधित रुग्णांशी संपर्क साधतील. त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेतील. या परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य टिकवून ठेवण्यासाठी त्यांना आपले अनुभव शेअर करतील. त्यातून धीर देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. कोरोनाविषयी लोकांमध्ये अनेक समज गैरसमज आहेत. त्यातून एखाद्याला लागण झाली तर ते खचून जातात. आपल्या घरच्यांचे कसे होईल, अशी त्यांना चिंता वाटत असते. अशावेळी त्यांचे मानसिक खच्चीकरणही होत असते. त्यांना आधार देण्याचा व आम्ही यातून बरे झालो आहोत, तुम्हीही बरे होऊ शकाल, असा विश्वास देण्यासाठी हा मनोभरोसा उपक्रम सुरु करण्यात येत आहे. त्यातून रुग्णाचा कोरोनाशी लढण्यासाठी आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.अशोक मोराळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस