पुणे : ससून रुग्णालयातील प्रयोगशाळेत कोरोना बाधित रुग्णांची चाचणी घेतली जात असल्याने राष्ट्रीय विषाणु संस्थे (एनआयव्ही) वरील चाचण्यांचा भार हलका झाला आहे. ससूनमध्ये मागील २५ दिवसांमध्ये १३०० हून अधिक रुग्णांचे नमुने तपासणीत आले आहेत. त्यामध्ये ससून रुग्णालयासह सातारा, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश आहे. दररोज २५० हून चाचण्या घेण्याची या प्रयोगशाळेची क्षमता आहे.कोरोना विषाणुचा संसर्ग वाढू लागल्यानंतर पुण्यासह राज्यभरातून रुग्णांच्या घशातील स्त्रावाचे नमुने एनआयव्ही मध्ये तपासणीसाठी पाठविले जात होते. रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत गेल्याने 'एनआयव्ही' चाचण्यांचा ताणही वाढत गेला. त्यानंतर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ससूनमधील प्रयोगशाळेसह राज्यात अन्य काही प्रयोगशाळांना चाचणीची परवानगी दिली. ससूनमधील प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक यंत्रणांसह तपासणीसाठी आवश्यक सर्व उपकरणे तसेच तज्ज्ञ मनुष्यबळ आहे.उपअधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली तीन सत्रांमध्ये चोवीस तास टीम कार्यरत आहे. एका सत्रात तीन डॉक्टर्स, चार तंत्रज्ञ तसेच अन्य चार कर्मचारी असतात. ससून रुग्णालयात येणाºया सर्व संशयित रुग्णांची तपासणी या प्रयोगशाळेत केली जाते. तसेच सातारा, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संशयितांची तपासणीही येथेच केली जात आहे. या भागात २४ तास कोणत्याही वेळेत नमुने आणले जातात. त्यामुळे सातत्याने सतर्क राहावे लागते.सध्या तपासणीसाठी दररोज सरासरी ५० नमुने येत आहेत. काही वेळा १०० च्यावरही नमुने येतात. नमुने आल्यानंतर त्याचे लेबल, नाव सगळी माहिती योग्य असल्याची खातरजमा करावी लागते. त्यात काही चुक वाटल्यास ते घेतले जात नाही. त्यानंतर घशाच्या स्त्रावाच्या नमुन्यातील विषाणुचा ह्यआरएनएह्ण वेगळा करावा लागतो. त्यासाठी अडीच ते तीन तास लागतात. ह्यआरएनएह्ण मिळाल्यानंतर रिएजंट एकत्रित करून पीसीआर मशिनवर तपासणी केली जाते. त्यातून मिळणारे आलेख अभ्यासून आवश्यकतेनुसार अंतिम चाचणी केली जाते. त्यानंतर लागण झालेली आहे किंवा नाही यावर शिक्कामोर्तब होते. त्यासाठी किमान दोन तास लागतात. चाचणीसाठी प्रयोगशाळेत तीन पीसीआर मशिन उपलब्ध आहेत. एका मशिनवर एकावेळी ९६ नमुन्यांची तपासणी करता येते. त्यानुसार एकावेळी २८८ नमुन्यांची तपासणी शक्य आहे.-----------
Corona virus : ससूनच्या प्रयोगशाळेने ‘एनआयव्ही’ चा भार हलका; मागील २५ दिवसांमध्ये १३०० हून अधिक रुग्णांचे नमुने तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 5:20 PM
ससूनमधील प्रयोगशाळेमध्ये अत्याधुनिक यंत्रणांसह तपासणीसाठी आवश्यक सर्व उपकरणे तसेच तज्ज्ञ मनुष्यबळ आहे.
ठळक मुद्देरुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत गेल्याने 'एनआयव्ही' चाचण्यांचा ताणही गेला वाढत ससून रुग्णालयासह सातारा, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णांचा समावेश