पुणे - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचा फैलाव जगातील अन्य देशांमध्ये झाला आहे. भारतातही कोरोना व्हायरसचे ४५ रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. कर्नाटक, दिल्ली, राजस्थान यापाठोपाठ महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसचे २ रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे.
पुण्यात एका पती-पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या दोघांवर पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. मात्र हे दोघं १ तारखेला पुण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसानंतर त्यांना त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. मात्र मागील सात-आठ दिवसांत हे दोघं कोणा-कोणाच्या संपर्कात आले याची चौकशी केली जाणार आहे. एका खासगी टूर कंपनीसोबत ते वर्ल्ड टूरला गेले होते. त्यांच्या सोबत असलेल्या त्यांच्या दोन मुलांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
धक्कादायक! कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव; पुण्यात आढळले २ रुग्ण
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, हे पती-पत्नी दुबईहून पुण्यात आले होते. त्यांची कोरोनाची टेस्ट घेतली होती त्या पॉझिटीव्ह आढळून आल्या आहेत. ते ज्या टॅक्सीतून आले आणि त्यांच्यासोबत ते ४० पर्यटक होते ते दुबईला गेले होते. ते राज्यातील विविध शहरांमधील आहेत. त्यांचाही शोध घेऊन त्यांनाही लागण झाली आहे की नाही याची तपासणी करणार आहोत. सध्या दोन्ही रुग्णांना सौम्य स्वरुपाची कोरोनाची लागण झाली आहे. हॉस्पिटलकडून दक्षता घेण्याचं काम सुरु आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच लोकांनी अतिशय दक्षता घेण्याची गरज आहे. कोरोनाबाबत ज्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या लोकांनी पाळाव्यात. शक्यतो आवश्यकता नसल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. काही लक्षणं आढळल्यास त्वरीत जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
तर लोकांनी फार घाबरु नये, पुणे महापालिका प्रशासनाकडून नायडू हॉस्पिटलमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या दोन व्यक्ती कोणाच्या संपर्कात आल्यात, कुटुंबाशी संपर्कात आल्या असतील ज्या ठिकाणी यांचा वावर झाला आहे. त्याठिकाणचा शोध घेऊन विशेष काळजी घेण्यात येत आहे अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
कोरोना’चा रूग्ण आढळल्याच्या अफवेने खामगावात खळबळ
कोरोनापासून बचावासाठी कपल्सने 'अशी' घ्या काळजी...
अकोल्यातील ‘कोरोना’ संशयिताचा अहवाल ‘निगेटिव्ह’!
भारतात धोका वाढला! आणखी दोन राज्यांत रुग्ण आढळले, संख्या पोहोचली 45 वर
काँग्रेसला कोरोनाचा धसका, 'दांडी यात्रा' पुढे ढकलण्याचा घेतला निर्णय