बारामती : बारामती तालुक्यातील माळेगाव येथे शनिवारी (दि २४) आढळलेल्या आठव्या कोविड-१९ संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला. बारामती ग्रामीण मधील हा कोरोना चा हा पहिला बळी आहे. या रुग्णाला किडनीचा विकार होता.डायलिसीससाठी हा रुग्ण पुणे शहरात खासगी रुग्णालयात दाखल झाला होता .त्याठिकाणी त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना आज त्या रुग्णाचा म्रूत्यू झाल्याची बातमी धडकली आहे .शहरातील भाजी विक्रेत्याचा यापूर्वी कोरोनामुळे म्रूत्यू झाला आहे.प्रतिकारक्षमता क्षीण झाल्याने पहिल्या रुग्णाचा म्रूत्यू झाला होता .त्यापाठोपाठ डायलीसीस वर असलेल्या माळेगाव च्या रुग्णाचा मृत्यु झाला होता.आज गेलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या बळीने प्रशासनाची चिंता वाढली आहे . दरम्यान, आज मृत्यू झालेला कोरोनाचा रुग्ण पुण्यातल्या एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी गेला होता .काल तपासणी केल्यानंतर त्याचा आज रिझल्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याने माळेगाव करांनी घाबरण्याचं कारण नाही. पण काळजी घेण्याची गरज आहे. माळेगावमध्ये संबंधित परिसर पोलिसांनी सील केला आहे .परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे .शहरात एकूण पाच रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत .तर आज झालेल्या दुसऱ्या मृत्यूमुळे आजपर्यंत कोरोनामुळे दोघांचा बळी गेला आहे .
Corona Virus : बारामतीत कोरोनाचा दुसरा बळी, माळेगावच्या रुग्णाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 3:11 PM
आज गेलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या बळीने प्रशासनाची चिंता वाढली आहे...
ठळक मुद्देशहरात एकूण पाच रुग्ण कोरोना मुक्त माळेगावमध्ये संबंधित परिसर पोलिसांनी सील केला