शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
5
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
6
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
7
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
8
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
9
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
10
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
11
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
12
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
13
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
14
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
15
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
17
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
18
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
19
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...
20
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी

Corona virus : पुण्यातील ससून रुग्णालयात 'अँटिजेन टेस्ट'मुळे गंभीर रुग्णांना मिळतोय दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2020 12:50 PM

काही मिनिटांच्या निदानामुळे उपचाराला गती

ठळक मुद्देकोरोनाचे लवकर निदान होत असल्याने या रुग्णांना तातडीने योग्य उपचार देणे शक्य

पुणे : ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी आलेले गंभीर स्वरूपाचे संशयित रुग्ण, गर्भवती महिला, अतिगरजेच्या शस्त्रक्रिया आवश्यक असलेल्या रुग्णांची अँटिजेन कीटद्वारे काही मिनिटांत कोरोना चाचणी होत आहे. त्यामुळे कोरोनाचे लवकर निदान होत असल्याने या रुग्णांना तातडीने योग्य उपचार देणे शक्य होत आहे. ही चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरच संशयितांची आरटी-पीसीआर चाचणी केली जाते. त्यामुळे मुख्य प्रयोगशाळेवरील ताणही कमी झाला आहे.ससून रुग्णालयामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. येथील सर्व रुग्णांच्या कोविड चाचण्या ससूनमधील प्रयोगशाळेतच केल्या जातात. पण रुग्णसंख्या वाढू लागल्याने काही दिवसांपासून अ‍ॅन्टीजेन चाचण्या तसेच ‘सीबीनॅट’ चाचणीही सुरू करण्यात आली आहे. रुग्णालयामध्ये कोविड रुग्णांप्रमाणेच नॉन कोविड रुग्णांवरही उपचार सुरू आहेत. त्यामुळे संशयितांची चाचणी होईपर्यंत त्यांना संशयित म्हणूनच उपचार केले जातात. त्यातच रुग्णालयामध्ये गंभीर अवस्थेत येणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. तसेच गर्भवती महिलांची प्रसुती, तातडीच्या शस्त्रक्रियाही कराव्या लागतात. त्यांच्यासाठी कोरोनाचे लवकर निदान होणे गरजेचे आहे. अँटिजेन चाचणी ५ ते १० मिनिटांतच होत असल्याने त्यांच्यावर उपचार करणे शक्य होत आहे.अ‍ॅन्टीजेनमध्ये एखादा संशयित रुग्ण निगेटिव्ह आल्यास  सीबीनॅट किंवा ‘आरटी-पीसीआर’ला प्राधान्य देण्यात येते. अहवाल मिळाल्यानंतर संबंधित रुग्णांना कोविड किंवा नॉन कोविड कक्षात हलविले जाते. मुख्य प्रयोगशाळेतील आरटी-पीसीआर चाचण्यांची क्षमताही आता वाढली आहे. चोवीस तासात सुमारे ८०० चाचण्या होत आहेत. गुरूवारपर्यंत प्रयोगशाळेत एकुण ३६ हजार २४३ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये ५ हजार ८७२ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. प्रयोगशाळेची क्षमता टप्प्याटप्याने वाढविली जात आहे. दररोज १२०० ते १३०० चाचण्यांपर्यंत ही क्षमता नेण्याचे नियोजन आहे. ससूनसह सातारा, नगर आदी भागातील भागातील नमुनेही काहीवेळा येत असतात.--------------ससुनमधील कोविड प्रयोगशाळेची सद्यस्थिती -सध्याची क्षमता (२४ तास) - सुमारे ८०० चाचण्यागुरूवारपर्यंत चाचण्या - ३६,२४३बाधित रुग्ण - ५८७२बाधितांचे प्रमाण - १६.२० टक्के-------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसsasoon hospitalससून हॉस्पिटल