Corona Virus : जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रूग्णांना पुण्यात मिळणार 'लाईफलाईन'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 02:57 PM2020-09-01T14:57:38+5:302020-09-01T15:02:02+5:30

अनेक गंभीर रूग्णांना शहरात बेड मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रशासनाला धारेवर धरत जिल्ह्यातील रूग्णांना प्राधान्य देण्याच्या सुचना केल्या होत्या.

Corona Virus : Serious patients of Corona in the district will get 'Lifeline' in Pune | Corona Virus : जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रूग्णांना पुण्यात मिळणार 'लाईफलाईन'

Corona Virus : जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर रूग्णांना पुण्यात मिळणार 'लाईफलाईन'

Next
ठळक मुद्देबेड मिळणे होणार सुलभ : जिल्हा परिषदेतर्फे नियंत्रण कक्ष, मोठ्या रूग्णालयांमध्ये नेमले कर्मचारी

निनाद देशमुख- 

पुणे : ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांची शहरात बेड मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात ससेहोलपट होत होती. याच्या अनेक तक्रारी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे करण्यात आल्या होत्या. रूग्णांची होणारी धावपळ थांबवण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे बेड नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आला असून त्या द्वारे त्यांना फोनवरूनच शहरातील रूग्णालयात उपलब्ध बेडची माहिती मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने शहरातील मोठ्या रूग्णालयात कर्मचारी नेमले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांना शहरात तातडीने उपचार मिळण्यास अनेक अडचणी होत्या. गावातून शहरात आल्यावर बेड मिळवण्यासाठी त्यांना तासंतास वाट पाहावी लागत होती. बेड न मिळाल्यास इतर रूग्णालयात धावपळ करावी लागत होती. यामुळे जिल्ह्यातील अनेक रूग्णांना प्राणही गमवावा लागला आहे. रूग्णांच्या होणा-या  धावपळी बाबत जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात तक्रारी करण्यात आल्या होत्या. गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्या आईलाही शहरातील रूग्णालयात बेड उपलब्ध झाला नव्हता. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधरण सभेत याचे मोठे पडसाद उमटले होते. अनेक गंभीर रूग्णांना शहरात बेड मिळत नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रशासनाला धारेवर धरत जिल्ह्यातील रूग्णांना प्राधान्य देण्याच्या सुचना केल्या होत्या.

यामुळे शहरातील रूग्णालयातील उपलब्ध बेडची माहिती मिळावी यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सुचनेनुसार जिल्हा परिषदेत बेड नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली. हा कक्ष २४ तास कार्यरत राहणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यलेखाधिकारी रविंत्र चव्हाण यांच्याकडे या कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे. या सोबतच वर्ग २ आणि ३ चे कर्मचारी या कक्षात नेमण्यात आले असून शहरातील रूग्णालयात उपलब्ध बेड बाबत माहिती ठेवली जाणार आहे. या साठी सर्व रूग्णालयात प्रत्येकी तिन शिफ्टमध्ये ३ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. हे कर्मचारी बेडची अद्यावत माहिती ठेवणार आहेत. नागरिकांना या कक्षाशी संपर्कसाधून बेड संबंधी माहिती घेता येणार आहे.
   ------
नियंणत्रच कक्षाचे असे चालणार काम
शहरातील रूग्णालयातील रिकाम्या बेड बाबत त्वरित माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेने प्रत्येक रूग्णालयात ३ कर्मचारी नेमले आहेत. हे कर्मचारी तिन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. रूग्णालयात एखादा बेड रिकामा झाल्यास याची माहिती दर चार तासाला नियंत्रण कक्षाला देतील. त्या नुसार कक्ष माहिती अद्यावत करेल. २६१३८०८३, २६१३८०८२ या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिकांना बेड उपलब्धते बाबत माहिती मिळेल.
-----------
जिल्ह्यातील कोविड रूग्णालयांची माहितीही ठेवणार अद्ययावत
जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहेत. या ठिकाणी उपलब्ध असणारे बेड तसेच सुविधांची माहिती या कक्षाद्वारे अद्ययावत ठेवली जाणार आहे.

-----
जिल्ह्यातील अनेक कोरोना बाधित रूग्ण शहरात येत होते. मात्र, त्यांना बेड मिळत नव्हता. योग्य माहिती मिळत नसल्याने अनेक गंभीर रूग्णांना तासंतास वाट पाहावी लागत होती. बेड न मिळाल्यास दुस ठिकाणी जावे लागत होते. परिणामी गोंधळाची स्थिती निर्माण होत होती. हे टाळण्यासाठी बेड नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या द्वारे रूग्णांना माहिती त्वरित मिळेल.ढ़
-आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी
 

Web Title: Corona Virus : Serious patients of Corona in the district will get 'Lifeline' in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.