शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
3
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
4
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
5
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
6
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
7
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
8
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
9
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
10
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
11
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
12
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
13
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
14
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
15
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
16
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
17
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
18
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक

Corona virus : खळबळजनक! खेड तालुक्यातील एका कंपनीत तब्बल १२० कामगार 'कोरोना पॉझिटिव्ह'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2020 6:48 PM

कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या कामगारांच्या संपर्कातील लोकांचा शोध सुरू..

ठळक मुद्देखेड तालुक्यात आत्तापर्यंत 1300 रुग्ण, 25 जणांचा मृत्यू

राजगुरूनगर: खेड तालुक्यातील महाळुंगे येथील एका कंपनीत तब्बल १२० कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यातील बहुतेक राजगुरूनगर व परिसरातील राहणारे आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

तालुक्यात कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत तेराशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत. तसेच पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यापासून चाकण राजगुरुनगर व तालुक्याच्या ग्रामीण भागातही रुग्णांची वाढ झपाट्याने वाढत आहे. चाकण म्हाळुंगे येथील एका कंपनीत तब्बल १२० रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चाकण औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या कंपनीने सुमारे सातशे जणांचे स्वॅब घेतले होते. त्यातील १२० जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे यांनी सांगितले.दरम्यान, तालुका वैद्यकीय अधिकारी बळीराम गाढवे पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे ,गटविकास अधिकारी अजय जोशी यांनी म्हाळुंगे येथील कंपनी व्यवस्थापनाला भेट देऊन याबाबत माहिती घेतली  आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले कामगार कोण कोणत्या परिसरातील आहे. याबाबत छाननी करण्याचे काम सुरू आहे. तसेच राजगुरुनगर व परिसरातील व ग्रामीण भागातील जवळपास तीस ते पस्तीस कामगार या कंपनीत कामास होते. त्यामुळे या कामगारांच्या गावीही भितीदायक वातावरण वाटू लागले आहे.

कंपनी काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर कंपनी व्यवस्थापनाने काही दिवस कंपनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र,या एकशे वीस जणांच्या संपर्कात कोण कोण व्यक्ती आल्या आहेत हे शोधणे प्रशासनाला आव्हानात्मक ठरणार आहे.

टॅग्स :KhedखेडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसDeathमृत्यूNavalkishor Ramनवलकिशोर रामshravan hardikarश्रावण हर्डिकर