शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

Corona virus : धक्कादायक! पुणे शहरातील कोरोनाबाधित गंभीर रुग्णांच्या आकड्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 1:23 PM

आयसीयु व ऑक्सिजनवरील रुग्णांच्या आकड्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण

ठळक मुद्देरुग्णालयांच्या माहितीत तफावत , काही रुग्णालये ‘अपडेट’ होईनातविभागीय आयुक्त कार्यालयाने ‘कोविड केअर सॉफ्टवेअर’ केले विकसित

राजानंद मोरेपुणे : शासकीय व खासगी रुग्णालयांमधील कोरोनाबाधित रुग्णांसाठी राखीव असलेल्या खाटांची ‘कोविड केअर सॉफ्टवेअर’वरील माहिती व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दैनंदिन अहवालातील आयसीयु बेड, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरवरील रुग्णांबाबतच्या माहितीत मोठी तफावत आढळून येत आहे. रविवारी (दि. २१) दुपारपर्यंत सॉफ्टवेअरवर माहिती भरलेल्या केवळ १२ रुग्णालयांमध्ये ८० पैही एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नव्हता. तर ५७६ रुग्ण ऑक्सिजनवर होते. पालिकेच्या शनिवारच्या अहवालानुसार व्हेंटिलेटरवर ५२ रुग्ण तर २७३ रुग्ण आयसीयुमध्ये व ऑक्सिजनवर होते. अद्याप दुपटीहून अधिक रुग्णालयांनी सॉफ्टवेअरवर माहिती अपडेट केलेली नाही. त्यामुळे आयसीयु व ऑक्सिजनवरील रुग्णांच्या आकड्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.विभागीय आयुक्त कार्यालयाने ‘कोविड केअर सॉफ्टवेअर’ विकसित केले आहे. त्यामध्ये पुण्यासह सातारा, कोल्हापुर, सांगली, सोलापुर या जिल्ह्यांमधील कोविड हॉस्पिटल, कोविड हेल्थ सेंटर आणि कोविड केअर सेंंटरमधील उपलब्ध व रिक्त बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजनची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना ही माहिती सहज मिळावी, हा त्यामागचा उद्देश आहे. रुग्णालयांकडूनच ही माहिती दररोज अद्ययावत करणे अपेक्षित आहे. या सॉफ्टवेअरवर पुणे महापालिका कार्यक्षेत्रात दि. २१ जूनपर्यंत एकुण २६ कोविड रुग्णालये व कोविड हेल्थ सेंटरची नावे आहेत.-----------------आकड्यांमध्ये तफावतमहापालिकेच्या अहवालानुसार शनिवारी शहरात २७३ रुग्ण गंभीर होते. त्यामध्ये ५२ व्हेंटिलेटरवर तर उर्वरीत आयसीयुमध्ये ऑक्सिजनवर होते. तर सॉफ्टवेअरवरील माहितीत रविवारी माहिती अद्ययावत केलेल्या १२ रुग्णालयांमध्येच ५७६ रुग्णांना ऑक्सिजन लावल्याचे दिसते. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन असलेले एकुण बेड ६२३ आहेत. तर व्हेंटिलेटर असलेल्या ८० आयसीयु बेडपैकी एकही बेड रिक्त नव्हता. तीच स्थिती व्हेंटिलेटर नसलेल्या ६४ आयसीयु बेडची होती.----------------------माहिती होईना अद्ययावतसॉफ्टवेअरमध्ये नावे असलेल्या २६ कोविड रुग्णालये व कोविड हेल्थ सेंटरपैकी५ रुग्णालयांची काहीच माहिती उपलब्ध नाही. तर ९ रुग्णालयांची माहिती रविवारी अद्ययावत केलेली नव्हती. शहरातील एका नामांकित रुग्णालयाने तर सहा दिवसांपासून माहिती भरलेली नाही. विशेष म्हणजे कोविडसाठी असलेले शहरातील सर्वाधिक खाटा या रुग्णालयात आहेत. त्यामुळे सॉफ्टवेअरचा उद्देश सफल होताना दिसत नाही.------------विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सॉफ्टवेअरवरील पुणे महापालिका क्षेत्रातील एकत्रित माहिती (दि. २१ जून दुपारी ४ पर्यंत)

कोविड रुग्णालये व कोविड हेल्थ सेंटर - २६एकुण कोविड बेड - २३०२, रिक्त - ३६४ऑक्सिजन नसलेले बेड - ७६४, रिक्त - ३६३ऑक्सिजन असलेले बेड - १०५५, रिक्त - १४२व्हेंटिलेटर नसलेले आयसीयु बेड - ९५, रिक्त - १व्हेंटिलेटरसह आयसीयु बेड - १४५, रिक्त - ००-------------------सॉफ्टवेअरवरील रुग्णालयांची अद्ययावत माहिती (दि. २१ जून दुपारी ४ पर्यंत)अद्ययावत माहिती भरलेली रुग्णालये - १२व्हेंटिलेटरसह आयसीयु बेड - ८०, रिक्त - ००व्हेंटिलेटर नसलेले आयसीयु बेड - ६४, रिक्त - ००ऑक्सिजन असलेले बेड - ६२३, रिक्त - ४७-----------महापालिका दैनंदिन अहवाल (दि. २० जून)एकुण गंभीर रुग्ण - २७३आयसीयु व ऑक्सिजनवरील रुग्ण - २२१व्हेंटिलेटरवरील रुग्ण - ५२-----------------------

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्तNavalkishor Ramनवलकिशोर राम