शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Corona Virus : उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत टाटा ट्रस्ट उभारणार 'कोविड केअर रुग्णालय'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 7:32 PM

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार

ठळक मुद्देटाटा ट्रस्टच्या मदतीने बारामतीत ७५ बेडसाठी ऑक्सिजन, २५ बेडसाठी व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध होणार

बारामती: बारामती शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तातडीने कोविड केअर रुग्णालय उभारण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सुचना दिल्या आहेत. त्यानुसार टाटा ट्रस्टच्या मदतीने बारामतीत ७५ बेडसाठी ऑक्सिजनची सुविधा, २५ बेडसाठी व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच शहरातील सिल्व्हर ज्युबली रुग्णालयात १०० बेडसाठी ऑक्सिजन सुविधा,  १५ व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बारामतीत रूई येथील रुग्णालयासह २३० ऑक्सिजन बेड उपलब्ध होणार आहेत.

ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांनी ‘लोकमत’शी बोलताना याबाबत माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार टाटा ट्रस्ट ही सुविधा उभारणार आहे. त्यानुसार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्री पवार यांचे कक्ष अधिकारी हनुमंत पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी संबंधित जागेची पाहणी केली. त्यानुसार ९ हजार स्क्वेर फूट जागेत ही सुविधा दिली जाणार आहे. बारामती वैद्यकीय महाविद्यालयासमोरील, महिला रुग्णालयासमोर असणाऱ्या नर्सिंग स्कूलच्या इमारतीमध्ये नियोजन करण्यात येणार आहे. सध्या ही इमारत वापरात नसल्याने याच ठिकाणी ७५ ऑक्सिजन आणि २५ व्हेंटिलेटर बेडची सुविधा कोरोना बाधित रुग्णांसाठी करण्यात येणार आहे. शिवाय सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात १०० ऑक्सिजन आणि १५ बेडला व्हेंटिलेटरची सुविधा येत्या काही दिवसात मिळणार आहे. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्ण संख्येनंतर देखील बारामतीकरांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

टाटा ट्रस्टच्या वतीने बुलढाणा येथील १०४ बेडचे रुग्णालय उभारले आहे. सांगली येथे ५० बेडचे काम सुरू आहे. त्या पाठोपाठ बारामती देखील लवकरच टाटा ट्रस्टच्या माध्यमातून काम मार्गी लागणार आहे. यामध्ये १०० बेड हे वातानुकुलित अतिदक्षता विभागांतर्गत उपलब्ध होतील. यामध्ये रुग्ण विभाग तपासणी, जनरल केअर, प्रयोग शाळा, स्क्रीनिंग, प्रोसेजर रूममध्ये प्रत्येक बेडला मेडिकेशन ड्राव्हर, ओव्हर बेड टेबल, आयबी स्टॅण्डसह सर्व बेडमेडिकल ऑक्सिजन पाईपने परस्परांशी जोडण्यात येणार आहे. याशिवाय अल्ट्रासॉनिक क्लिनिक्स, रक्त साठवण सुविधा, शुगर लेव्हर मॉनिटर, इन्फ्रारेडथर्मामिटर, स्टीम स्टर लायजर, इसीजी, पल्स ऑक्सिमीटर, मोबाईल एक्सरे,अल्ट्रा सोनोग्राफी मशीन, हिमॅटोलॉजी, अ‍ॅनेलायझर, सिलिंज व इन्फुजन पंप,वॉर्ड नर्सिंग स्टेशन आदी सुविधा बारामतीकरांना उपलब्ध होणार आहेत.—

टॅग्स :BaramatiबारामतीTataटाटाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलAjit Pawarअजित पवार