पुणे : कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून महसूल विभागाचे हजारो दावे प्रलंबित असून, यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. सध्या पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे 2 हजार 918 प्रलंबित महसुली दावे प्रलंबित आहे. यामुळेच आता येत्या 1 ऑगस्टपासून सुनावण्या घेण्याचे आदेश विभागीय आयुक्त यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.
पुणे शहरामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर मार्च अखेर पर्यंत रुग्ण संख्ये मोठी वाढ झाली. त्या शासनाने लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर 24 मार्चनंतर बहुतेक सरकारी कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले आहे. यामुळेच पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे घेण्यात येणाऱ्या महसुली दाव्यांच्या सुनावण्या ठप्प झाल्या. तालुकास्तरावर तहसिलदार, प्रात अधिकारी यांनी दिलेल्या निकालाच्या विरोधात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे दावा दाखल केले जातात. यामध्ये प्रामुख्याने फेरफार मधील चुका दुरूस्ती, कुळाच्या नोंदी, रस्ता, पाणंद रस्ते, सातबातील चुका आदी संदर्भातील हे दावे असतात. ग्रामीण भागातील शेतकरी , सर्वसामान्य नागरिक तलाठी, सर्कल ने केलेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी वर्षांनो वर्ष महसूल दरबारी हेलपाटे मारत असतात.
पुणे जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी ऑनलाईन पध्दतीने महसुली प्रकरणांच्या सुनावण्या घेण्यास सुरूवात केली होती. पंरतु यामध्ये अनेक तांत्रिक अडचणी येऊ लागले. दावे दाखल करणारे बहुतेक लोक ग्रामीण भागातील, दुर्गम भागातील असल्याने देखील न लाईन सुनावणी घेणे आवघड जात होते. यामुळे ऑनलाईन सुनावणीचा प्रयोग देखील बंद पडला. यामुळेच आता नागरिकांची मागणी वाढू लागल्याने येत्या 1 ऑगस्टपासून प्रत्यक्ष सुनावणी घेण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. ----अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित महसुली दावे वर्ष प्रलंबित दावे 2012 042013 142014 282015 572016 2142017 6262018 8822019 8762020 216-----दिवसाला सरासरी 30 सुनावण्या घेण्याचे नियोजन पुणे जिल्ह्यात दर वर्षी दाखल होणाऱ्या दाव्यांची संख्या आणि प्रलंबित दाव्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. यामुळेच कोरोना पुर्वी दिवसाला सरासरी 100 ते 120 प्रकरणाची सुनावणी घेतली जात होत्या. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व सुरक्षित सामाजिक अंतर राखण्यासाठी दिवसाला सरासरी 30 सुनावण्या घेण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्रभारी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुधीर जोशी यांनी सांगितले . ----अतिरिक्त जिल्हाधिकारी पद तीन महिन्यांपासून रिक्त पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड यांच्या आकस्मिक निधनानंतर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त आहे. पुण्यातील प्रलंबित दाव्यांची संख्या लक्षात घेता शासनाला देखील हे पद जास्त काळ रिक्त ठेवणे योग्य होणार नाही. यामुळे आता शासनाकडून या पदावर लवकरात लवकर नियमित अधिकारी नियुक्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत. ---