बारामती : बारामती शहरातील आढळलेल्या दुसऱ्या कोविड-१९ संक्रमित रुग्णाच्या कुटुंबातील दोघाजणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्णाच्या संपर्कातील १६ जणांना तपासणीसाठी नायडु रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यापैकी १२ जणांचे अहवाल मिळाले असुन त्यामध्ये दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी याबाबत माहिती दिली. सोमवारी(दि ६)समर्थ नगरमध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या 'हाय रिस्क कॉन्टॅक्ट' मध्ये बारा व्यक्तींची तपासणी करण्यात आली .त्यामध्ये रुग्णाची सून व मुलगा या दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. बारामतीकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व लॉकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये,असे आवाहन प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.
corona virus : बारामतीतील 'त्या' कोरोनाबाधित रुग्णाच्या कुटुंबातील आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 7:09 PM
बारामतीकरांची काळजी वाढली.
ठळक मुद्देरुग्णाच्या संपर्कातील १६ जणांना तपासणीसाठी नायडु रुग्णालयात हलविण्यात आले होते.