शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Corona virus : पुण्यात व्हेंटिलेटरसाठी वेटिंग : ४८० रूग्णांवर उपचार सुरु  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 1:27 PM

पुणे महापालिका हद्दीत कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचारासाठी सर्व मिळून ६ हजार ५३७ बेड विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.

ठळक मुद्दे४४४ आयसीयु बेडपैकी केवळ १२ बेड रिक्तमहापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८० व्हेंटिलेटर बेडवर रूग्णांवर उपचार सुरू

पुणे : महापालिका, ससून हॉस्पिटलसह शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील महापालिकेने ज्या खाटा कोविड-१९ च्या रूग्णांवरील उपचारासाठी आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी सद्यस्थितीला व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाहीत. महापालिकेचे नियंत्रण असलेल्या या सर्व ४८० व्हेंटिलेटरवर सध्या रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-१९ च्या करिता उपलब्ध करून दिलेल्या डॅशबोर्डवर शहरातील विविध हॉस्पिटलमधील (पुणे महापालिका हद्दीतील) ७ हजार ९९४ एकूण बेड क्षमता दाखविण्यात आली आहे. प्रत्यक्षात यापैकी ४ हजार ८६९ बेड कोविड-१९ च्या रूग्णांसाठी खाजगी हॉस्पिटलने दिलेले आहेत. तर उर्वरित बेड हे महापालिकेच्या हॉस्पिटल व ससून हॉस्पिटलमधील आहेत.    पुणे महापालिका हद्दीत कोविड-१९ च्या रूग्णांवर उपचारासाठी सर्व मिळून ६ हजार ५३७ बेड विविध हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत. सोमवारी सायंकाळी पाचपर्यंत २ हजार २४७ आयसोलेशन बेडपैकी ९०२ बेड रिक्त होते. ४४४ आयसीयु बेडपैकी केवळ १२ बेड रिक्त होते. तर महापालिकेच्या सर्वच्या सर्व म्हणजे ४८० व्हेंटिलेटर बेडवर रूग्णांवर उपचार सुरू होते़ तसेच ३ हजार ३६६ ऑक्सिजन बेडपैकी केवळ ७३ बेड रिक्त होते.      -------------पुणे शहरातील बहुतांशी कोविड-१९ च्या हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडवर रूग्णांवर उपचार चालू असल्याने नव्याने आढळून येणाऱ्या रूग्णांना तात्काळ वरिल बेडची आवश्यकता असल्याचे ते सहजासहजी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची मोठे हाल सध्या सुरू आहेत. यामुळे लक्षणे दिसून येणाऱ्या किंवा कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या अर्धा तासापेक्षा जास्त संपर्कात आलेल्या व्यक्तींनी लागलीच तपासणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे.     -----------------------तीन हॉस्पिटल महापालिका ताब्यात घेणार शहरातील जनरल बेड वगळता ऑक्सिजन, आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची कमतरता दूर करण्यासाठी पुणे महापालिका प्रशासनाने शहरातील तीन खाजगी हॉस्पिटल ताब्यात घेतला आहे. यानुसार इनामदार हॉस्पिटल कोंढवा, केईएम हॉस्पिटल, सहयाद्री हॉस्पिटल कोविड-१९ च्या रूग्णांसाठी ताब्यात घेण्यात येणार असून, यामुळे साधारणत: अडीचशे बेडची आणखी वाढ रूग्णांसाठी शहरात होणार आहे़.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका