पुणे: करोनाच्या पार्श्वभूमीवर आज राज्यातच सर्वत्र ' लॉक डाऊन' झाले आहे. जनसंपर्क टाळण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे स्त्री आधार केंद्र स्वागत करत आहे.सद्यस्थितीत महिला सुरक्षा आणि समुपदेशनासाठी कार्यालयात प्रत्यक्ष भेटीतून काम होऊ शकत नसले तरी 'ई-सेवां'मार्फत हे कामकाज चालणार असल्याची माहिती विधान परिषद उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 'लोकमत' शी बोलताना दिली.
त्या म्हणाल्या, गेली अनेक दशके स्त्री आधार केंद्र स्त्रियांच्या समस्या सोडवण्या बरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरतपणे कार्यरत आहे. यासाठी स्त्री आधार केंद्रामार्फत विविध उपक्रम राबवले जातात, कायमच स्त्री आधार केंद्र काळाची गरज ओळखून काहीतरी समाजहिताकारक करण्याचा प्रयत्न करते . सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्यक्ष भेटीपेक्षा संस्थेद्वारे दूरध्वनी वरून समुपदेशन, कौटुंबिक सल्ला व मार्गदर्शन, अत्याचार विरोधी मार्गदर्शन, केले जाणार आहे तसेच कायदेशीर मार्गदर्शन, स्वमदत गट आणि महिला दक्षता समिती च्या नावे नोंदविलेल्या महिलांना दर आठवड्यात महिलांना कायदे विषयक प्रशिक्षण, शाश्वत विकासाची ध्येय गाठण्या साठी कार्यक्रम व उपक्रम तसेच इतर तत्कालीन उपक्रम एप्रिल नंतर अशाच ई सेवांमार्फत केले जाणार आहे.
महिलांच्या संरक्षणासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या घरगुती हिंसाचाराला थांबवण्यासाठी हेच कार्य करोना बाबतचे सर्व नियम पळून नव्या पद्धतीने स्त्री आधार केंद्राच्या कार्यकर्त्यांद्वारे केले जाणार आहे. यामध्ये इमेल, फोनकॉल आणि व्हाट्स अँप वर तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत.तसेच टेलिफोनिक समुपदेशनाद्वारे तक्रारी रजिस्टर करणे व औपचारिक नोंदणी साठी सहकार्य व त्याची पोच देण्यात येणार आहे.इमेल अथवा व्हाट्स अँप द्वारे जरुरी फॉर्म भरून घेणे. याशिवाय इमेल, व्हॉट्स अँप आणि फोन द्वारे नोटीस पाठवणे आणि व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारे समुपदेशन, मार्गदर्शन व चर्चा करणे अशा सेवा देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या सर्व कामकाजाचे नियोजन आणि देखरेख सर्व कार्यकर्ते आणि कर्मचारी आपापल्या घरून करणार आहेत.तसेच तसेच स्त्री आधार केंद्राद्वारे करोना विषयी समाजातील गैसमज व भीती दूर करण्यासाठी आणि करोना विषयी जनजागृती करण्यासाठी सोमवार ते शनिवार सकाळी ११:०० ते ०२:०० या वेळेत करोना शंका निरसन टेलिफोनिक केंद्रही चालवले जाईल (दूरध्वनी क्रं:- ०२०-२४३९४१०३).
फक्त महिलांसाठी राखीव दूरध्वनी क्रं:- -२०-२४३९४१०३ (वेळ दुपारी २ ते ५)
आर डि शेलार:- -०२०-२४३९४१०४ ( वेळ दुपारी २ ते ५ )
व्हाट्स अँप आणि मॅसेज नं:- -९९२२६६२५३३