पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरातील कोरोना पुन्हा डोके वर काढू लागला आहे. त्यामुळे पुणेकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी ६६१ कोरोनाबाधित आढळल्यानंतर बुधवारी ही संख्या तब्बल ७४३ वर पोहचली आहे. आजची कोरोनारुग्णांची संख्या काही महिन्यांमधील सर्वाधिक वाढ आहे.
पुणे : शहरात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला असून, बुधवारी तब्बल ७४३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गेल्या पाच महिन्यातील ही सर्वाधिक रूग्णवाढ आहे़. दुसरीकडे संशयितांच्या तपासणीचे प्रमाणही शहरात मोठ्या प्रमाणात वाढले असून, आज दिवसभरात ६ हजार ५१४ जणांची तपासणी करण्यात आली़ तपासणीच्या तुलनेत आजच्या रूग्णांची टक्केवारी ११. ४० टक्के इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाचवाजेपर्यंत शहरातील विविध रूग्णालयांत ऑक्सिजनसह उपचार घेणाºया कोरोनाबाधितांची संख्या ४१० इतकी असून, शहरातील गंभीर रूग्णसंख्या ही २०७ इतकी आहे. तर आज दिवसभरात ३८२ कोरोनाबाधित कोरोनामुक्त झाले असून, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ही ३ हजार ५५९ इतकी झाली आहे. शहरात आजपर्यंत ११ लाख १४ हजार ६६८ हजार जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी १ लाख ९९ हजार ६९६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ९१ हजार ३०० जण कोरोनामुक्त झाले आहेत़. आज दिवसभरात ४ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी १ जण पुण्याबाहेरील आहेत. आजपर्यंत शहरात कोरोनामुळे ४ हजार ८३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
पुणे शहरात आजमितीला २८९६ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु आहे. यापैकी १६४ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. पुण्यात आतापर्यंत १ लाख ९७ हजार ९६४ रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी १ लाख ९० हजार २४२ रुग्णांनी कोरोनामुक्त झाले आहे. शहरात या घडीला कोरोना रुग्णांसाठी एकूण बेड्सची संख्या ४,४५७ इतकी आहे. यामध्ये आयसीयू बेड्सची संख्या २३३ आहेत. यापैकी सध्या १५५ आयसीयू बेड्स रिकामे आहेत. पुण्यात व्हेंटिलेटर बेड्सची संख्या ही ३८३ इतकी आहे. कोरोना रुग्णांची सध्याची संख्या पाहता पुण्यात उपचारांसाठी पुरेसे बेड्स उपलब्ध आहेत