लक्ष्मण मोरे पुणे : शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल अडीच हजारांवर गेला असून मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडाही दिडशेपर्यंत गेला आहे. कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० या वयोगटातील सर्वाधिक रुग्ण असून तरुणांनी काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ८ मे रोजीच्या एकूण २२४५ रुग्णांपैकी १४७९ रुग्ण हे २० ते ६० या वयोगटातील आहेत. हे प्रमाण रुग्णसंख्येच्या ६५ टक्के एवढे आहे. या गटातील मृत्यूंचे प्रमाण मात्र कमी आहे.शहरात ९ मार्च रोजी पहिला रुग्ण आढळून आला होता. ८ मे पर्यंत हा आकडा २२४५ पर्यंत गेला आहे. तर मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा १३६ वर गेला आहे. शहरात ० ते १०० वयोगटातील रुग्णांची तपशीलवार माहिती ठेवली जात आहे. त्यातही पुरुष, महिलांची वेगळी आकडेवारी काढली जात असून या वयोगटातील मृत्यूमुखी पडलेल्यांचीही नोंद ठेवली जात आहे. पालिकेकडील आकडेवारीनुसार, सर्वाधिक रुग्ण ४२२ रुग्ण हे ३० ते ४० या वयोगटातील आहेत. त्यातही महिलांचे प्रमाण १८५ एवढे आहे. त्याखालोखाल २० ते ३० हा वयोगट असून या गटात एकूण ४२१ रुग्ण आहेत.पालिकेसह पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून वारंवार फिजिकल डिस्टंन्सिंग ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मास्क, सॅनिटायझरसह सुरक्षा साधने वापरण्यावर भर देण्याचे आवाहन केले जात आहे. शहरातील बहुतांश भागात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी सुरु आहे. विशेषत: कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष लक्ष केंद्रित करुन उपाययोजना करण्यात येत आहेत. तरीही हा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाच्यादृष्टीने सर्वाधिक संवेदनशील वयोगट म्हणून ५० ते ९० याकडे पाहिले जात होते. परंतू, २० ते ६० या वयोगटात सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने या वयोगटातील नागरिकांनीही विशेष खबरदारी बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.=======कोरोना बाधित रुग्ण (८ मेपर्यंत)वयोगट स्त्री पुरुष एकूण0-10 51 75 12610-20 94 122 21620-30 178 243 42130-40 185 237 42240-50 159 200 35950-60 142 135 27760-70 92 108 20070-80 41 53 9480-90 02 03 0590-100 -- -- --=========कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा तपशील (८ मेपर्यंत)वयोगट मृत्यू0-10 - -10-20 - -20-30 - 0730-40 - 0740-50 - 2050-60 - 3460-70 - 3870-80 - 1780-90 - 0390-100 - -
Corona virus : तरुणांनो, सावधान... पुणे शहरातील कोरोनाबाधितांमध्ये २० ते ६० दरम्यान सर्वाधिक रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 6:30 AM
शहरातील कोरोनाबाधितांचा आकडा तब्बल अडीच हजारांवर..
ठळक मुद्देशहरातील बहुतांश भागात लॉक डाऊनची कडक अंमलबजावणी सुरु कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष लक्ष केंद्रित करुन उपाययोजना मास्क, सॅनिटायझरसह सुरक्षा साधने वापरण्यावर भर देण्याचे आवाहन