पुणे : शहरातील कोरोनामुक्त रूग्णांची संख्या बुधवारी ६० हजारांच्या पार गेली असून दिवसभरात १०८९ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात १२११ रुग्णांची भर पडली असून कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७७ हजार ३६८ झाला आहे. विविध रुग्णालयातील ८१५ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ५५६ झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८१५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८३ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३३२ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, २ हजार ४७० रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.दिवसभरात ३५ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १२ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १ हजार ८४९ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ८९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ६० हजार ९६३ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ५५६ झाली आहे.-------------दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण ६ हजार ६९० नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ३ लाख ७७ हजार ८१ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
Corona Virus: पुणेकरांना दिलासा!कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६० हजारांच्या पार;१०८९ रुग्ण दिवसभरात झाले बरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 8:59 PM
कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७७ हजार ३६८
ठळक मुद्देतब्बल ८१५ अत्यवस्थ : १२११ रूग्णांची वाढअॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ५५६